हिंगोली पोलिस जुगार कारवाई

शेतकऱ्याच्या वेशात जाऊन पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई

Hingoli Gambling Operation : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलीस स्टेशनने जुगारी अड्ड्यावर धडक मारून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या मुद्देमालात 54,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शेतकऱ्याच्या वेशात जाऊन पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई

Hingoli Gambling Operation

 

6 जुगारी ताब्यात, 54 हजारांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली (Hingoli Gambling Operation) : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा धडाका सुरूच आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सेनगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सेनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत हत्ता पाटी येथील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी 1 जून 2026 रोजी धाड टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व जुगार साहित्यासह एकूण 54,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या पथकाला कारवाईसाठी रवाना करण्यात आले होते. हत्ता पाटीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर शेतशिवारात हा जुगार अड्डा सुरू होता. पोलिसांची चाहूल लागू नये म्हणून पथकातील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याचा वेश परिधान करून शेतात प्रवेश केला आणि अचानक छापा टाकला. 

या (Hingoli Gambling Operation) धडक कारवाईत पुंजाजी लोभाजी गडदे, ज्ञानबा कोंडूजी पादरे दोघेही रा. हत्ता पाटी, अनिल कचरू साळवे  रा. साखरा, रवी गुलाब चव्हाण  रा. पाटोंदा, भाऊराव रामराव पवार  रा. भानखेडा, सर्व तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली, या पाच जणांसह एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 52 पत्ते, 4 मोबाईल, जुगाराचे साहित्य व रोख 14,610 रुपये असा एकूण 54,610 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या (Hingoli Gambling Operation) प्रकरणी सेनगाव पोलीस स्टेशन येथे मटका व तिरट नावाचा जुगार खेळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ, पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, संदीप जाधव, किशोर सावंत, हरिभाऊ गुंजकर, साईनाथ कंठे यांच्या पथकाने यशस्वी केली. अवैध धंदे चालकांना सळो की पळो करून सोडण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी यापूर्वीच दिला असून या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

बकऱ्या खरेदीचा केला बहाना
सेनगाव तालुक्यातील हत्ता शेतशिवारात जुगार सुरू असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी मोटरसायकलवर जाऊन बकऱ्या खरेदी करावयाच्या आहे असे भासवून जुगारावर छापा मारला अचानक आलेल्या पोलिसांमुळे जुगारी देखील भांबावून गेले प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे शेतकरी आणि बकरा व्यवसायिकाच्या वेशभूषेत आलेले पाहून अनेक जण भांबावून गेले होते.

संबंधित सामग्री

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

Hingoli District and Sessions Court: जिल्ह्यात चोर्‍यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता तर चोरट्यांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले आहे. हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात चोरी

Sep 30, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026
हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

Hingoli District Drought: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून या तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू

Sep 27, 2026