करळा शिवार हत्या प्रकरण

आलेगावातील युवकाची कारला शिवारात धारदार शस्त्राने हत्या; पातूर पोलिसांत गुन्हा दाखल

Karala Shivar Murder Case: करळा शिवारात घडलेल्या पाहुण्याला सावधीची घटना! एका १७ वर्षीय युवकाने करळा शिवारातील सुस्थापित स्थळावर धारदार शस्त्राने वारी करून हत्या करण्यात आली.

आलेगावातील युवकाची कारला शिवारात धारदार शस्त्राने हत्या; पातूर पोलिसांत गुन्हा दाखल

Karala Shivar Murder Case

पातूर (Karala Shivar Murder Case) : पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारला शिवारात एका १७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. *यश गजानन गिरे* असे मृत पावलेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.

पहाटेच्या सुमारास घडली घटना
प्राथमिक माहितीनुसार, ही (Karala Shivar Murder Case) घटना आज सकाळी अंदाजे ५:०० ते ५:३० वाजण्याच्या सुमारास कारला शिवारातील सुधाकरराव नाईक आश्रमशाळेच्या गेटसमोर घडली. यश गिरे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले.

उपचारापूर्वीच मृत्यू
नागरिकांनी तत्परता दाखवत यशला तातडीने उपचारासाठी आलेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, त्याची गंभीर प्रकृती पाहता पुढील उपचारासाठी त्याला तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) हलवण्यात आले. परंतु, दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

तीन संशयितांनी केला हल्ला
प्राथमिक अंदाजानुसार, तीन युवकांनी मिळून धारदार शस्त्राने वार करत हा खून केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. (Karala Shivar Murder Case) घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दराडे, घुगे व पातूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

पोलीस तपास सुरू
शवविच्छेदन: मृतदेहाचे अकोला येथील जीएमसी (GMC) मध्ये शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गुन्हा दाखल: याप्रकरणी पातूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पातूर पोलीस करत आहेत.

संबंधित सामग्री

पातूर पोलिसांची मोठी कारवाई : अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल; 3 जनावरे व बोलेरो वाहन जप्त

पातूर पोलिसांची मोठी कारवाई : अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल; 3 जनावरे व बोलेरो वाहन जप्त

 पातूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

Jul 30, 2026
बनावट नावामुळे नांदखेडच्या शेतकऱ्याची बदनामी; 'तो मी नव्हेच' म्हणण्याची वेळ

बनावट नावामुळे नांदखेडच्या शेतकऱ्याची बदनामी; 'तो मी नव्हेच' म्हणण्याची वेळ

Nandkhed Farmers' Fraud: 'तो मी नव्हेच' याचनेतून शेतकरांच्या बदनामीवर काळजी: नांदखेडच्या गणेश इंगळे यांनी बनावट नावाचा आरोप खुलासा करीत आहे, तर पोलिसाने फसवणूक बाबीवर तपास सुरू केला आहे.

Jul 13, 2026
दिग्रस बु. ग्रामपंचायत कार्यालयात भीषण आग; शासकीय कागदपत्रे खाक, ५ ते ६ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचा आरोप

दिग्रस बु. ग्रामपंचायत कार्यालयात भीषण आग; शासकीय कागदपत्रे खाक, ५ ते ६ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचा आरोप

पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दिग्रस बु. गटग्रामपंचायत कार्यालयाला सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.

Jul 08, 2026
पातूर-अकोला महामार्गावर भीषण अपघात; युनिकॉर्न चालक गंभीर जखमी, पोलिसांची तत्परता

पातूर-अकोला महामार्गावर भीषण अपघात; युनिकॉर्न चालक गंभीर जखमी, पोलिसांची तत्परता

पातूर-अकोला महामार्गावर मंगळवारी एक भीषण दुचाकी अपघात झाला. अकोल्याहून पातूरच्या दिशेने येणारी युनिकॉर्न मोटरसायकल अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला कोसळली.

Jul 08, 2026