परळीत मध्यरात्री थरार; हॉटेल व्यावसायिकाची धारदार शस्त्राने हत्या

बीड जिल्ह्यातील परळी शहरात गुरुवारी (21 मे 2026) मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परळीत मध्यरात्री थरार; हॉटेल व्यावसायिकाची धारदार शस्त्राने हत्या

Hotel Businessman Murder

बीड (Hotel Businessman Murder) : बीड जिल्ह्यातील परळी शहरात गुरुवारी (२१ मे २०२६) मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन अरुणोदय मार्केट परिसरात हॉटेल व्यावसायिक कारभारी आंधळे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून व्यापारी आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कारभारी आंधळे हे परळीत ‘पवन हॉटेल’ चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. २१ मे रोजी रात्री नेहमीप्रमाणे हॉटेल बंद झाल्यानंतर कारभारी आंधळे हे संशयित आरोपी सचिन सोमनाथ राठोड आणि सुमीत पवार या दोघांसोबत दारू पीत बसले होते. अरुणोदय मार्केट लाईन परिसरातील एका मोकळ्या जागेत ही पार्टी सुरू होती.

मात्र, दारू पित असतानाच अचानक त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून जुना वाद उफाळून आला. या किरकोळ वादाचे रूपांतर आधी शिवीगाळीत आणि नंतर थेट हाणामारीत झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही आरोपींनी कारभारी आंधळे यांच्यावर धारदार चाकूने हल्ला करत त्यांचा गळा चिरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हल्ल्यानंतर कारभारी आंधळे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. विशेष म्हणजे, मुख्य आरोपी सचिन राठोड यानेच कारभारी यांच्या लहान मुलाला फोन करून “तुमचे वडील जखमी अवस्थेत पडले आहेत,” अशी माहिती दिली आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

वडिलांबाबत माहिती मिळताच कारभारी यांचा मोठा मुलगा ओमकेश आंधळे आणि इतर नातेवाईकांनी तातडीने अरुणोदय मार्केट लाईन परिसरातील मोकळ्या जागेत धाव घेतली. तिथे कारभारी आंधळे हे गंभीर जखमी अवस्थेत निपचित पडलेले आढळून आले. नातेवाईकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

घटनेनंतर पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे पाठवण्यात आला.

दरम्यान, फिर्यादी ओमकेश कारभारी आंधळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२७/२६ अंतर्गत कलम १०३(१) आणि ३(५) मर्डर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत पहाटेच एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

या घटनेनंतर परळी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी वर्गात संतापाची भावना व्यक्त होत आहे. मध्यवर्ती भागात अशा प्रकारची निर्घृण हत्या झाल्याने नागरिकांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, यामागे आणखी किती आरोपी सहभागी आहेत आणि आर्थिक व्यवहाराचा नेमका संबंध काय होता, याचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला विशेष NIA कोर्टाने जामीन मंजूर केला. सविस्तर आदेश अद्याप समोर आलेला नाही.

Sep 29, 2026