हिंगोली जुगार कारवाई

हिंगोली ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Hingoli Gambling Raid: कारवाडी शिवारात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर हिंगोली ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून तिघा जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण

हिंगोली ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Hingoli Gambling Raid

हिंगोली (Hingoli Gambling Raid) : कारवाडी शिवारात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर हिंगोली ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून तिघा जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मौजे कारवाडी शिवारात अग्रवाल यांच्या प्लॉटिंगच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत काहीजन जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

गोपनीय माहितीच्या आधारे बाळासाहेब शिवाजी खोडवे यांनी पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे आरोपी पांडुरंग गणेश घुगे, संतोष गणेश घुगे, बालाजी भाऊराव घुगे, सर्व रा. सेलसुरा ता.जि. हिंगोली हे झन्ना मन्ना नावाचा जुगार पत्त्यावर पैसे लावून खेळताना मिळून आले. पोलिसांनी घटनास्थळा वरून एकूण 2200 रुपयांची रोख रक्कम जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्ह्याचा तपास बाळासाहेब खोडवे हे करीत आहेत.

टैग्स: Hingoli Gambling Raid

संबंधित सामग्री

हिंगोली शहरातील शाळेजवळील झन्ना-मन्ना जुगारावर छापा; ९ जणावर गुन्हा दाखल

हिंगोली शहरातील शाळेजवळील झन्ना-मन्ना जुगारावर छापा; ९ जणावर गुन्हा दाखल

Hingoli gambling raid: हिंगोली शहर पोलिसांनी छापा  मारून ९ जुगार्‍यावर गुन्हा दाखल केला. हिंगोली शहरातील संभाजी विद्या मंदिर शाळेसमोर झन्नामन्ना  जुगार सुरु असल्याची माहिती

Sep 14, 2026
हिंगोलीत जुगारावर छापा, 23 जणांवर गुन्हा दाखल; १८ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त

हिंगोलीत जुगारावर छापा, 23 जणांवर गुन्हा दाखल; १८ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Hingoli Gambling Raid: चारचाकी वाहनासह ८ मोटार सायकल १५ मोबाईल व २ लाख १६ हजार रुपये असा एकुण १८ लाख ४७ हजार २० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

Sep 06, 2026
गोरेगाव व संतुक पिंपरी येथे झन्ना मन्ना जुगारावर छापे

गोरेगाव व संतुक पिंपरी येथे झन्ना मन्ना जुगारावर छापे

Hingoli Gambling Raids: जिल्ह्यातील गोरेगाव व  संतुक पिंपरी येथे सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर स्थानिक गुन्हे शाखा व गोरेगाव पोलिसांनी छापे मारून गुन्हे दाखल केले. 

Aug 12, 2026