SBI Recruitment 2026

SBI मध्ये 9,124 पदांची महाभरती; ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी, 31 ऑगस्टपर्यंत अर्ज

सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

SBI मध्ये 9,124 पदांची महाभरती; ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी, 31 ऑगस्टपर्यंत अर्ज

SBI Recruitment 2026

Junior Associate पदांसाठी भरती; 7,680 नियमित तर 1,444 बॅकलॉग जागा, Prelims-Mains आणि स्थानिक भाषा चाचणीद्वारे निवड

सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI कडून क्लार्क कॅडरमधील Junior Associate (Customer Support & Sales) पदांसाठी तब्बल 9,124 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.

9,124 जागांमध्ये नियमित आणि बॅकलॉग पदांचा समावेश

SBIच्या या भरतीमध्ये एकूण 9,124 पदे आहेत. त्यापैकी 7,680 पदे नियमित रिक्त जागांमधून, तर 1,444 पदे बॅकलॉग व्हेकन्सीअंतर्गत भरण्यात येणार आहेत. देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेल्या SBIच्या शाखांनुसार या पदांचे वाटप करण्यात आले आहे.

मोठ्या संख्येने रिक्त पदे उपलब्ध झाल्याने बँकिंग परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

कोण करू शकते अर्ज?

Junior Associate पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. पदवीच्या अंतिम वर्षात किंवा अंतिम सत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थीही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत आवश्यक सवलत देण्यात येईल.

अर्जासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांना 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SBIच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे.

Prelims, Mains आणि स्थानिक भाषा चाचणी

SBI Junior Associate पदासाठी उमेदवारांची निवड विविध टप्प्यांत केली जाणार आहे. यामध्ये ऑनलाइन पूर्व परीक्षा (Prelims), मुख्य परीक्षा (Mains) आणि स्थानिक भाषा चाचणी (LPT) यांचा समावेश आहे.

त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी अर्जाची अंतिम तारीख लक्षात घेऊन वेळेत ऑनलाइन अर्ज साद करणे आवश्यक आहे.

संबंधित सामग्री

MPSC चा मोठा निर्णय; गट-क पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

MPSC चा मोठा निर्णय; गट-क पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी घेण्यात येणार

Sep 10, 2026
SBI मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती; परीक्षा नाही, थेट मुलाखतीतून होणार निवड

SBI मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती; परीक्षा नाही, थेट मुलाखतीतून होणार निवड

बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBIने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे.

Sep 01, 2026
संघटना वाढीसाठी युवकांना मुख्य प्रवाहात आणावे: ॲड. नाजेर काजी

संघटना वाढीसाठी युवकांना मुख्य प्रवाहात आणावे: ॲड. नाजेर काजी

Adv. Najer Kaji: हिंगोलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक संवाद दौरात युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन केले गेले. विविध कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यात आली.

Apr 05, 2026