जंगलात भटकू नका, मुख्य प्रवाहात या

जंगलात भटकू नका, मुख्य प्रवाहात या

Naxal Surrender

आत्मसमर्पित संगीता उर्फ ललिता यांचे नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन

गडचिरोली (Naxal Surrender) : जंगलात भटकंती आणि हिंसेच्या मार्गातून काहीही साध्य होत नाही, हे स्वतःच्या २२ वर्षातील अनुभवातून स्पष्ट झाल्याने ‘हिंसेचा मार्ग सोडा आणि संविधानाचा स्वीकार करून मुख्य प्रवाहात या,’ असे भावनिक आवाहन आत्मसमर्पित नक्षलवादी संगीता उर्फ ललिता यांनी आपल्या माजी सहकार्‍यांना केले आहे.

संगीता उर्फ ललिता यांनी आपल्या पती गिरिधर तुमरेती व इतर साथीदारांसह दि. २२ जून २०२४ रोजी गडचिरोली पोलीस दलासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. सुमारे दोन दशकांहून अधिक काळ २००२ पासून  नक्षल चळवळीत सक्रिय असलेल्या संगीता यांनी या काळात जंगलातील कठीण जीवन अनुभवले; मात्र हा मार्ग चुकीचा असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी हिंसेचा त्याग करत मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी सांगितले की, ‘नक्षल चळवळीत राहून कोणताही सकारात्मक बदल घडत नाही. उलट स्वतःचे आणि कुटुंबाचे आयुष्य अंधारात जाते. त्यामुळे मी संविधानिक मार्ग स्वीकारला आहे.
आपल्या उर्वरित सहकार्‍यांना उद्देशून त्या म्हणाल्या, ‘उगीच जंगलामध्ये भटकू नका. तुमचे आई-वडील, कुटुंबीय तुमची वाट पाहत आहेत. त्यांच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी आत्मसमर्पण करा व सामान्य जीवन जगा असाही संदेश त्यांनी आपल्या व्हिडीओ संदेशातून दिला आहे.

शासनाच्या पुनर्वसन योजनांचा लाभ घ्या - आ. धर्मरावबाबा आत्राम

दरम्यान अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील उर्वरित नक्षलवादी यांनी आत्मसमर्पण करून शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्य शासनाकडून आत्मसमर्पण करणार्‍यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात असून आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी विविध पुनर्वसन योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आदी ओळख पत्र व सेवांच्या नोंदणीसह आर्थिक मदत, निवास व्यवस्था, शिक्षण तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनांचा लाभ घेऊन सन्मानाने नवे आयुष्य सुरू करता येते असेही आ.डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी गावाजवळ एसटी बस पलटली.

Sep 18, 2026
गडचिरोलीत स्कार्पिओमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

गडचिरोलीत स्कार्पिओमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

स्कार्पिओ वाहनात वैद्यकीय महाविद्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले केतन पोचमपल्लीवार मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली.

Sep 06, 2026
गडचिरोलीत पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के; सिरोंच्यात ३.६ तीव्रतेची नोंद

गडचिरोलीत पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के; सिरोंच्यात ३.६ तीव्रतेची नोंद

गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.

Sep 03, 2026
कोरचीतील रस्ते खड्डेमय; ३ कोटींच्या निधीच्या ‘तुकड्यां’वर सवाल!

कोरचीतील रस्ते खड्डेमय; ३ कोटींच्या निधीच्या ‘तुकड्यां’वर सवाल!

नगरपंचायतीचा दर्जा मिळून दशक पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाही कोरची शहरातील रस्त्यांची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होत आहे.

Aug 27, 2026
प्रसूतीसाठी रेफर केल्यानंतर २१ वर्षीय मातेचा बाळासह मृत्यू; चामोर्शी रुग्णालयावर उपचारात दिरंगाईचे आरोप

प्रसूतीसाठी रेफर केल्यानंतर २१ वर्षीय मातेचा बाळासह मृत्यू; चामोर्शी रुग्णालयावर उपचारात दिरंगाईचे आरोप

चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील २१ वर्षीय गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Aug 24, 2026