Zilla Parishad Teacher

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमधून वरिष्ठांवर गंभीर आरोप

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमधून वरिष्ठांवर गंभीर आरोप

Zilla Parishad Teacher

मुदखेड तालुक्यात कार गोदावरी नदीपात्रात घालून टोकाचे पाऊल; एसडीआरएफने तिघांचे मृतदेह बाहेर काढले

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत संबंधित शिक्षकाने कार थेट गोदावरी नदीपात्रात घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेचा तपास नांदेड पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव सुनील मोरे असून ते हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या मुलगी सारा आणि मुलगा सुमित यांना सोबत घेऊन मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील गोदावरी नदीपात्रात कार घातली. कारमध्येच गुदमरल्याने तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेपूर्वी सुनील मोरे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत हदगाव गट शिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या जाचाला कंटाळल्याचा उल्लेख केला होता. प्राथमिक माहितीनुसार, गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्या त्रासामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबतचा अधिकृत तपास पोलीस करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एसडीआरएफच्या पथकाने नदीपात्रातून कार बाहेर काढत त्यामधील तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले.

सुनील मोरे हे भोकर तालुक्यातील बेंबर गावचे मूळ रहिवासी होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, एका शिक्षकाने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह जीवन संपवल्याच्या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास नांदेड पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026