माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या स्वागताचे फलक आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी फाडले

भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या यवतमाळ दौर्‍यावरून जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या स्वागताचे फलक आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी फाडले

Yavatmal News

यवतमाळ (Yavatmal News) : भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या यवतमाळ दौर्‍यावरून जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून व बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतल्याने  आंबेडकरी संघटनांनी न्या. गवई यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, शुक्रवारी शहरात ठिकठिकाणी लावलेले त्यांचे स्वागत फलक महाराष्ट्र दिनी कार्यकर्त्यांनी फाडले.

एका कार्यक्रमासाठी न्या. गवई यवतमाळमध्ये येणार असल्याने शहरात त्यांच्या स्वागताचे मोठे बॅनर लावण्यात आले होते. यामुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी ज्या वकिलांनी हे फलक लावले होते, थेट त्यांच्या घरावर धडक देवून  'समाजद्रोही काम करणार्‍यांचे स्वागत कसे करता?', असा जाब विचारला. त्यानंतर आंबेडकरी समाज संघटनांच्या पदाधिकार्‍यांकडून काल माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या स्वागतासाठी लावण्यात आले बॅनर फाडण्यात आले. यावेळी अ‍ॅड. जयसिंह चव्हाण, उमेश मेश्राम, अँड.धनंजय मानकर, अँड.प्रशांत किर्तक, राजा गणवीर, संजय बोरकर, प्रमोदिनी रामटेके, नारायण थुल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

संबंधित सामग्री

यवतमाळमध्ये कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; घाटंजी तालुक्यात हळहळ

यवतमाळमध्ये कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; घाटंजी तालुक्यात हळहळ

घाटंजीतील चिखलवर्धा येथे कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय अंशचा उपचारादरम्यान मृत्यू. ऑक्सिजन व रुग्णवाहिका उपलब्धतेबाबत नातेवाइकांचे गंभीर आरोप.

Sep 18, 2026
यवतमाळमध्ये सर्पदंशाने ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; झोपेत कानाला दंश, उपचारादरम्यान आर्यनची प्राणज्योत मालवली

यवतमाळमध्ये सर्पदंशाने ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; झोपेत कानाला दंश, उपचारादरम्यान आर्यनची प्राणज्योत मालवली

घाटंजी तालुक्यातील माणूसधरी येथे सर्पदंशाची दुर्दैवी घटना घडली असून, उपचार सुरू असताना ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

Aug 26, 2026
मानोरा येथे भीषण अपघात : अंत्यविधी आटपून परतताना कार डिव्हायडरला धडक; ४ जण गंभीर जखमी

मानोरा येथे भीषण अपघात : अंत्यविधी आटपून परतताना कार डिव्हायडरला धडक; ४ जण गंभीर जखमी

चार जणांच्या कारचा बुधवारी (15 जुलै) पहाटे मानोरा शहराजवळ भीषण अपघात झाला.

Jul 15, 2026
शुन्य व्याजदराने नियमित पीक कर्ज परतफेडीची संपली मुदत

शुन्य व्याजदराने नियमित पीक कर्ज परतफेडीची संपली मुदत

जिल्ह्यात सध्या पीक कर्जमाफीचे वारे वाहू लागले आहेत.

Apr 01, 2026
‘तो’ वादग्रस्त टोलनाका होणार कायमस्वरुपी बंद

‘तो’ वादग्रस्त टोलनाका होणार कायमस्वरुपी बंद

दारव्हा-कारंजा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१(सी) वर भुलाई ते भांडेगाव या गावांच्या मधात टोलनाका उभारला गेला.

Mar 28, 2026