जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त स्वाक्षरी मोहीम व बाल कामगार शोध अभियान

बालकामगार निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यासाठी नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त स्वाक्षरी मोहीम व बाल कामगार शोध अभियान

World Day Against Child Labour

बालकामगार प्रथा रोखण्यासाठी प्रशासनाची जनजागृती; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

हिंगोली (World Day Against Child Labour) : जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात जनजागृतीपर स्वाक्षरी मोहीम आणि बाल कामगार शोध अभियान राबविण्यात आले.

या मोहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बालकामगार निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यासाठी नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्वाक्षरी मोहिमेनंतर शहरातील विविध भागांमध्ये बाल कामगार शोध अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत हॉटेल, वर्कशॉप, दुकाने तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित व्यावसायिकांना बालकामगार न ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच बालकामगार आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला.

बालकांच्या हक्कांच्या संरक्षणावर भर

या अभियानाचा मुख्य उद्देश बालकामगार प्रथा रोखणे, बालकांच्या शिक्षण आणि संरक्षणाच्या हक्कांचे जतन करणे तसेच बालकामगार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा होता. प्रत्येक बालकाला शिक्षण, संरक्षण आणि सुरक्षित बालपणाचा हक्क मिळावा यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन

प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले की, आपल्या परिसरात कोणतेही बालक काम करताना आढळल्यास तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८, स्थानिक पोलीस ठाणे किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधावा.

या मोहिमेत कामगार विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. बालकांचे शिक्षण, संरक्षण आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी अशा जनजागृतीपर आणि तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026