भरधाव पिक-अपची दुचाकीला जबर धडक, पती-पत्नीसह मुलगा ठार 

भरधाव वेगाने येणाऱ्या पीकअप वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील तीन जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना २३ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता वाशिम–मंगरुळपीर रोडवरील पार्डी टकमोर फाट्या

भरधाव पिक-अपची दुचाकीला जबर धडक, पती-पत्नीसह मुलगा ठार 

Washim Accident

वाशिम (Washim Accident) : भरधाव वेगाने येणाऱ्या पीकअप वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील तीन जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना २३ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता वाशिम–मंगरुळपीर रोडवरील पार्डी टकमोर फाट्यावर घडली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला.

प्राप्त माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील वारा जहागीर येथील रहिवासी संतोष लांभाडे (वय ४०), त्यांची पत्नी कलावतीबाई लांभाडे (वय ३५) आणि मुलगा ईश्वर लांभाडे (वय १२) हे तिघे वारा येथून पार्डी टकमोर येथे नातेवाईकांकडे आले होते. तेथून परत वारा येथे जात असताना पार्डी टकमोर फाट्यावर चौफुलीवरून समोर जात असताना मंगरुळपीरकडून येणारे पीकअप वाहन संतोष लांभाडे यांना दिसले नाही. परिणामी पीकअपने मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात संतोष लांभाडे, कलावतीबाई लांभाडे आणि त्यांचा मुलगा ईश्वर लांभाडे हे तिघेही जागीच ठार झाले. धडक दिल्यानंतर पीकअप वाहनाचा चालक वाहन सुसाट वेगाने वाशिमकडे घेऊन पसार झाला.

अपघाताचा मोठा आवाज ऐकून पार्डी टकमोर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तेव्हा तिघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती वारा जहागीर येथे पोहोचताच गावात शोककळा पसरली. या प्रकरणाची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026