कोल्हापूर संताप! तरुणींना जाळ्यात ओढून शोषण करणाऱ्या नराधमाचा पर्दाफाश..!

अमरावती व नाशिकच्या व्हिडीओ व्हायरल प्रकरणांनंतर आता कोल्हापूरच्या शिरोलीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोल्हापूर संताप! तरुणींना जाळ्यात ओढून शोषण करणाऱ्या नराधमाचा पर्दाफाश..!

Viral Video Case

कोल्हापूर (Viral Video Case) : अमरावती आणि नाशिकमधील व्हिडीओ व्हायरल प्रकरण ताजे असताना आता कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाहिद समीर सनदे (वय 22) या तरुणाने अनेक तरुणींना प्रेमाच्या आणि भावनिक जाळ्यात अडकवून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, यामागे संघटित टोळी कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहिद सनदे हा फार्मसीचे शिक्षण घेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने 18 ते 22 वयोगटातील तरुणींशी संपर्क साधून त्यांच्याशी मैत्री केली. हळूहळू विश्वास संपादन करून त्याने या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे.

त्यानंतर तो संबंधित तरुणींना कोल्हापूर व शिरोली परिसरातील लॉजमध्ये घेऊन जात असे. तेथे त्याने त्यांच्यावर अत्याचार करून आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रित केल्याचा गंभीर आरोप आहे. हे व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी देत तो पीडित तरुणींवर मानसिक व शारीरिक दबाव टाकत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

हा प्रकार उघडकीस येण्यामागे एका पीडित तरुणीने दाखवलेले धैर्य कारणीभूत ठरले. तिने राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला आणि आरोपीचा काळा चेहरा समोर आला.

तक्रार मिळाल्यानंतर हातकणंगले पोलिसांनी तातडीने कारवाई करत शाहिद सनदे याला अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून पेठवडगाव न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपीने तयार केलेले काही व्हिडीओ त्याने आपल्या एका मित्रालाही पाठवल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र हा साथीदार सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे. या प्रकरणात 8 ते 10 तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर शिरोली परिसरात प्रचंड असंतोष पसरला आहे. नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध गटांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. या निषेधार्थ शिरोली गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल तसेच मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याला निवेदन देत नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून अधिक पुरावे गोळा केले जात आहेत.

संबंधित सामग्री

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी 11 पोलिसांवर FIR. मानवाधिकार आयोगानंतर तपास CIDकडे.

Sep 24, 2026
अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाठीचार्जाचा आरोप; दीपक वागसकर यांच्या मृत्यूनंतर तणाव. कार्यकर्त्यांकडून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.

Sep 24, 2026