Vadapav Dispute

पायाला पाय लागला अन् वाद विकोपाला; पुण्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

वडापाव खरेदी करताना गर्दीत पायाला पाय लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद एका 28 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला.

पायाला पाय लागला अन् वाद विकोपाला; पुण्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Vadapav Dispute

गणेश पेठेतील डुल्या मारुती चौकातील घटना; वैभव साळुंखेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे : वडापाव खरेदी करताना गर्दीत पायाला पाय लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद एका 28 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला. पुण्यातील गणेश पेठ परिसरातील डुल्या मारुती चौकात हा प्रकार घडला. शिवम परदेशी असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूप्रकरणी वैभव साळुंखे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवम परदेशी आणि वैभव साळुंखे हे दोघेही गणेश पेठ परिसरात वास्तव्यास असून त्यांची एकमेकांशी तोंडओळख होती. घटनेच्या दिवशी दोघेही डुल्या मारुती चौकातील वडापावच्या गाडीवर गेले होते. वडापाव घेण्यासाठी गर्दीत उभे असताना दोघांच्या पायांचा अनावधानाने स्पर्श झाला. याच किरकोळ प्रकारावरून त्यांच्यात वाद सुरू झाला.

वाद वाढल्यानंतर वैभव साळुंखे याने शिवमच्या छातीवर जोरदार मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत शिवमला गंभीर दुखापत झाली आणि त्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच शिवमचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे गणेश पेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. क्षणिक संताप आणि किरकोळ कारणातून घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्येही संतापाची भावना आहे.

दरम्यान, या घटनेतील आरोपी वैभव साळुंखे हा एका बिल्डरकडे अकाउंटंट म्हणून काम करतो. विशेष म्हणजे, शिवम आणि वैभव या दोघांच्याही वडिलांचा व्यवसाय रिक्षाचालकाचा आहे. सर्वसामान्य कुटुंबातील दोन तरुणांमधील किरकोळ वादाला गंभीर वळण लागल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
केतन अग्रवाल प्रकरणात मोठा डिजिटल पुरावा; 1,801 चॅट्सचा डेटा रिकव्हर, लोहगडवरील फोटोंमधून कटाचा तपास पुढे

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा डिजिटल पुरावा; 1,801 चॅट्सचा डेटा रिकव्हर, लोहगडवरील फोटोंमधून कटाचा तपास पुढे

केतन अग्रवाल प्रकरणात 1,801 चॅट्सचा डेटा, 11 डिलीट WhatsApp चॅट्स आणि लोहगडवरील फोटोंचा तपास; 5,053 पानी आरोपपत्रात डिजिटल पुरावे.

Oct 03, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026