कळमनुरी महिला आंदोलन

ब्राह्मण गल्लीतील महिलांचा स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी आक्रमक पवित्रा, आंदोलनाचा इशारा

Kalamnuri Women Protest: शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या समस्यांमुळे संतप्त महिलांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

ब्राह्मण गल्लीतील महिलांचा स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी आक्रमक पवित्रा, आंदोलनाचा इशारा

Kalamnuri Women Protest

कळमनुरी (Kalamnuri Women Protest) : शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या समस्यांमुळे संतप्त महिलांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.  

ब्राह्मण गल्लीत सध्या आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून तोही अवेळी होत असल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे. दैनंदिन कामकाज करताना महिलांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियमित पाणीकर भरूनही महिन्यातून केवळ दोन ते तीन वेळाच पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सकाळी 7 ते 9 या निश्चित वेळेत व किमान दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी महिलांनी केली आहे.  

पाणीटंचाई सोबतच परिसरातील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. नाल्या तुडुंब भरल्या असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. (Kalamnuri Women Protest) कचरागाडी नियमित येत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया व इतर संसर्गजन्य रोगांचा धोका वाढल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. आठवड्यातून किमान एकदा नाल्यांची साफसफाई, दररोज कचरागाडीची सेवा आणि नियमित स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.  

या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास (Kalamnuri Women Protest) नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा महिलांनी दिला आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासन या गंभीर समस्यांकडे किती गांभीर्याने लक्ष देते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.  

सदर निवेदनावर उषा कावडे, कविता कावडे, श्रद्धा देशपांडे, शारदा घोलप, लीला कस्तुरे,गौरी कस्तुरे,  शिवानी,  माधुरी कुलकर्णी, गीता कावडे, मालती दिवाळकर, वैशाली कावडे,  मंजू पांडे, वैशाली लाखकर,  रेणुका जोशी,  नंदा देशमुख, रजनी अग्रवाल, नालिनी दिवाकर,  दिपाली पाध्ये,  अंजली कामठकर,  माधवी, संगीता कावडे, सुरेखा कावडे, अंजली राऊत, सुमती कावडे यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित सामग्री

तात्काळ दुष्काळ जाहीर करा; औशात महिलांचा आक्रोश मोर्चा!

तात्काळ दुष्काळ जाहीर करा; औशात महिलांचा आक्रोश मोर्चा!

Ausa Women protest: लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपून गेली असून, कष्टाने पेरलेले सोयाबीन

Sep 15, 2026
दारूबंदी व ‘लाडकी बहीण’ योजनेच्या प्रलंबित लाभासाठी निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मोर्चा

दारूबंदी व ‘लाडकी बहीण’ योजनेच्या प्रलंबित लाभासाठी निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मोर्चा

Akola Women Morcha: गावागावात वाढत असलेल्या अवैध गावठी दारूच्या विक्रीला आळा घालावा तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा प्रलंबित लाभ पात्र महिलांना तातडीने मिळावा

Aug 18, 2026
परभणीतील मनपा आंदोलक आक्रमक; मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे

परभणीतील मनपा आंदोलक आक्रमक; मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे

Parbhani Municipal Protest: थकीत वेतन आणि जीएसटी अनुदान फरकाची रक्कम मिळावी, यासाठी सोमवार १० ऑगस्ट पासून महापालिकेतील कर्मचारी कामबंद आंदोलनावर आहेत. शासनाचे आंदोलनाकडे दुर्लक्ष

Aug 17, 2026
कळमनुरीत 13 ऑगस्टला &quotढोल बजाओ आंदोलन" नगर परिषदेच्या कारभाराविरोधात नागरिक आक्रमक  

कळमनुरीत 13 ऑगस्टला &quotढोल बजाओ आंदोलन" नगर परिषदेच्या कारभाराविरोधात नागरिक आक्रमक  

Kalamnuri Municipal Council: कळमनुरी शहरातील वाढती घाण, अनियमित पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांकडे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त कळमनुरी शहरातील नागरिक..

Aug 11, 2026
नियमित वेतनासाठी महापालिकेत अधिकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन!

नियमित वेतनासाठी महापालिकेत अधिकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन!

Latur Municipal Protest: लातूर शहर महानगरपालिका करमचारियों ने नियमित वेतन व सेवा निवृत्ति वेतन विस्तार, जीएसटी अनुदान वाढवण्याच्या मागणीसाठी सांघिक आंदोलन केले.

Aug 10, 2026