गुत्तेदार आत्महत्या प्रकरण

गुत्तेदाराच्या आत्महत्या प्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल!

Contractor suicide case: पैशांच्या व्यवहारातून वारंवार होत असलेल्या कथित त्रासाला कंटाळून वायगाव येथील ५० वर्षीय  गुत्तेदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे.

गुत्तेदाराच्या आत्महत्या प्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल!

Contractor suicide case

 

पैशांच्या व्यवहारातून कथित त्रास; आत्महत्येपूर्वी डायरीत लिहिली आरोपींची नावे

उदगीर (Contractor suicide case) : पैशांच्या व्यवहारातून वारंवार होत असलेल्या कथित त्रासाला कंटाळून वायगाव येथील ५० वर्षीय  गुत्तेदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. आत्महत्येपूर्वी संबंधित व्यक्तींनी त्रास दिल्याचे सांगत त्यांची नावे डायरीत लिहून ठेवल्याचे समोर आले असून, याप्रकरणी ११ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

दयानंद बाबूराव हुल्ले (वय ५०, रा. वायगाव, ता. उदगीर, ह.मु. लातूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा आदित्य हुल्ले यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे.तालुक्यातील वायगाव येथे ५० वर्षीय गुत्तेदार दयानंद हुल्ले यांनी राहत्या घरातील खोलीच्या स्लॅबच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली होती. 

पोलिसांच्या माहितीनुसार, दयानंद हुल्ले यांनी काही व्यक्तींना पैसे दिले होते. हे पैसे परत मिळावेत म्हणून त्यांनी संबंधितांकडे वारंवार मागणी केली. मात्र, पैसे परत न करता संबंधितांनी त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वायगाव येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दयानंद हुल्ले यांनी आत्महत्येपूर्वी कथित त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावे डायरीत लिहून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळे सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणाला आता गुन्ह्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ३१ ऑगस्ट रोजी फिर्यादीने पोलिस ठाण्यात हजर राहून जबाब दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Contractor suicide case) याप्रकरणी आसीफ काझी, किरण पायाळ, निखिल जांभळे, लोंढे सर, घनश्याम मोरे, मीना सर, विनय जाकते, हरिभाऊ भगत, गणेश हॉटेलचे मालक, केंद्रे इंजिनियर आणि रहिम भाई अशा ११ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक डी. डी. गाडे यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बेंबडे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

आत्महत्येपूर्वी डायरीत नावे; प्रकरणाला नवे वळण
दयानंद हुल्ले यांनी आत्महत्येपूर्वी कथित त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावे डायरीत लिहून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळे सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणाला आता गुन्ह्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ३१ ऑगस्ट रोजी फिर्यादीने पोलिस ठाण्यात हजर राहून जबाब दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Contractor suicide case) याप्रकरणी आसीफ काझी, किरण पायाळ, निखिल जांभळे, लोंढे सर, घनश्याम मोरे, मीना सर, विनय जाकते, हरिभाऊ भगत, गणेश हॉटेलचे मालक, केंद्रे इंजिनियर आणि रहिम भाई अशा ११ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

लग्नाचे आमिष, बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप; बारामतीतील जिल्हा परिषद सदस्य अडचणीत

लग्नाचे आमिष, बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप; बारामतीतील जिल्हा परिषद सदस्य अडचणीत

पुणे जिल्हा परिषदेत दोन दिवसांपूर्वी एका तरुणीने केलेल्या आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

Jul 30, 2026
बालाजी पाटील यांच्या आमरण उपोषणास समर्थनार्थ कमानीवर चढून शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

बालाजी पाटील यांच्या आमरण उपोषणास समर्थनार्थ कमानीवर चढून शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

विविध जनहिताच्या मागण्यांसाठी चाकूर (जि. लातूर) येथे २० जुलैपासून चाकूर नगरपंचायत कमानीसमोर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत.

Jul 29, 2026
परभणीत मच्छीमारांचा सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न...!

परभणीत मच्छीमारांचा सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न...!

Parbhani fisherman's self-immolation: प्रशासकीय फसवणूक, कामगार कायद्याचे उल्लंघन आणि शासकीय अनास्था याला कंटाळलेल्या पिडित जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथील मच्छीमार

Jun 10, 2026