Hunger Strike

बालाजी पाटील यांच्या आमरण उपोषणास समर्थनार्थ कमानीवर चढून शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

विविध जनहिताच्या मागण्यांसाठी चाकूर (जि. लातूर) येथे २० जुलैपासून चाकूर नगरपंचायत कमानीसमोर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत.

बालाजी पाटील यांच्या आमरण उपोषणास समर्थनार्थ कमानीवर चढून शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

Hunger Strike

चाकूर : विविध जनहिताच्या मागण्यांसाठी चाकूर (जि. लातूर) येथे २० जुलैपासून चाकूर नगरपंचायत कमानीसमोर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, आंदोलनाच्या दहाव्या दिवशी (२९ जुलै) देखील त्यांच्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ दोन शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास कमानीवर चढून आपला जीव धोक्यात घालून आंदोलन केले.

आमरण उपोषणादरम्यान दहाव्या दिवसापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने दोन शेतकरी चाकूर येथील कमानीवर चढले. यावेळी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याची तयारी केल्याची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.

नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाच्या वाहनाच्या मदतीने शिडी लावून पोलिसांनी कमानीवर चढत दोन्ही शेतकऱ्यांना सुरक्षित खाली उतरवून ताब्यात घेतले. याचवेळी दोघांनी अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे संभाव्य अनर्थ टळला.

संबंधित सामग्री

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026