परभणीत पुणे–नांदेड खाजगी ट्रॅव्हल्स बस पलटली; ७ प्रवासी जखमी...!

परभणीत पुणे–नांदेड खाजगी ट्रॅव्हल्स बस पलटली; ७ प्रवासी जखमी...!

Travel Bus Crash

गंगाखेड तालुक्यातील करम पाटीजवळील घटना; तिघांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले

गंगाखेड (Travel Bus Crash) : पुणे येथून नांदेडकडे जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स बस पलटी होऊन सात प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवार (७ मे) रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गंगाखेड–परळी मार्गावरील करम पाटीजवळ घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून नांदेडकडे प्रवासी घेऊन जाणारी यशश्री ट्रॅव्हल्सची बस गंगाखेडकडे येत असताना रस्त्याखाली जाऊन पलटी झाली. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले.

जखमींमध्ये लिला भानुदास वांजळे (वय ५० वर्ष), नितीन सदाशिव वाहुळे (वय ३२ वर्ष), ताई सदाशिव वाहुळे (वय ४५ वर्ष) सर्व रा. वारजे, पुणे; सयाबाई गणेश चव्हाण (वय ४५ वर्ष), गणेश काशीराम चव्हाण (वय ५० वर्ष) दोघे रा. मांडवा, ता. पुसद; निशांत निळकंठ वानखेडे (वय २६ वर्ष) रा. नांदेड व धुरपता अंगद हाके (वय २५ वर्ष) रा. उक्कडगाव यांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच खाजगी रुग्णवाहिका चालक रामेश्वर भालेराव, परमेश्वर भालेराव व हनुमान इंगळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

उपजिल्हा रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक कातकडे, डॉ. केशव मुंडे, डॉ. पी. आर. चट्टे, डॉ. कैलास चांदकर तसेच परिचारिका मंजुषा राख, अश्विनी मुंडे, द्वारकादास बडे, भीमराव राठोड, प्रशांत राठोड आदींनी जखमींवर प्रथमोपचार केले. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसची प्रादेशिक परिवहन विभागाने नियमित तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा डंका! डायल 112 सेवेत राज्यात प्रथम क्रमांक

हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा डंका! डायल 112 सेवेत राज्यात प्रथम क्रमांक

Hingoli Dial 112 Service: संकटात सापडलेल्या नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्यात हिंगोली जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण महाराष्ट्रात बाजी मारली आहे. डायल ११२ या आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली

Sep 01, 2026
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-361 वरील अपघात मालिका सुरूच!

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-361 वरील अपघात मालिका सुरूच!

National Highway Accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- 361 वरील भाटेगाव कालव्यावरील अपघाताची मालिका अखंड सुरूच आहे. पपई वाहतूक करणारे बुलेरो वाहन सायंकाळी पलटी झाले

Aug 30, 2026
परभणीत कौसडी येथे बोअरवेलच्या खड्ड्यातून तीन वर्षीय बालकाचे थरारक रेस्क्यू

परभणीत कौसडी येथे बोअरवेलच्या खड्ड्यातून तीन वर्षीय बालकाचे थरारक रेस्क्यू

Child Rescue Operation: जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारातील शेतात बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या तीन वर्षीय बालकाला अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश

Aug 20, 2026
तारापीठमधील हॉटेलला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

तारापीठमधील हॉटेलला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Tarapith Hotel fire: पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ येथील एका खाजगी हॉटेलला सोमवारी सकाळी मोठी आग लागली. हॉटेलमध्ये अडकलेल्या सात जणांचा भाजल्याने मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी

Aug 17, 2026
दैनिक  देशोन्नतीच्या वृत्तामुळे मुंबर्ईचे पथक हिंगोलीत तात्काळ दाखल

दैनिक  देशोन्नतीच्या वृत्तामुळे मुंबर्ईचे पथक हिंगोलीत तात्काळ दाखल

Hingoli Railway Bridge Problem: शहरातील खटकाळी रस्त्यावरील नवीन भूमीगत रेल्वे पुलाखाली पावसाचे पाणी साचून वाहतुकीला खोळंबा होत होता. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले होते. यासाठी मुंबईचे पथक दाखल

Aug 09, 2026