बालक रेस्क्यू मोहीम

परभणीत कौसडी येथे बोअरवेलच्या खड्ड्यातून तीन वर्षीय बालकाचे थरारक रेस्क्यू

Child Rescue Operation: जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारातील शेतात बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या तीन वर्षीय बालकाला अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश

परभणीत कौसडी येथे बोअरवेलच्या खड्ड्यातून तीन वर्षीय बालकाचे थरारक रेस्क्यू

Child Rescue Operation

 

प्रशासन व ग्रामस्थांच्या प्रयत्नांना आले यश; बुधवार दुपारची घटना

परभणी (Child Rescue Operation) : जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारातील शेतात बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या तीन वर्षीय बालकाला अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला बुधवार १९ ऑगस्ट रोजी यश आले. आदियान नदीम शेख असे रेस्क्यू करण्यात आलेल्या बालकाचे नाव असून, त्याला पुढील उपचारासाठी तातडीने परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बुधवार १९ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कौसडी शिवारातील गट क्रमांक २५ मध्ये ही घटना घडली. बालक आईसोबत शेतात गेले होते. शेतात हळदीची खुरपणी व इतर कामे सुरू असताना बालक बोअरवेलच्या खड्ड्यात पडल्याचे निदर्शनास आले. (Child Rescue Operation) घटना घडल्याचे लक्षात येताच आई व नातेवाईकांनी आरडाओरड केली. त्यानंतर भ्रमणध्वनीद्वारे गावात माहिती देण्यात आली. काही वेळातच शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. व बचाव कार्याला सुरुवात केली. यानंतर घटनेची माहिती मिळताच आरोग्य, महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. कौसडी, बोरी, जिंतूर तसेच परभणी येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली. जिल्हा प्रशासनानेही (Child Rescue Operation) घटनेची गंभीर दखल घेत बचावकार्याला आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले.

परभणीचे जिल्हाधिकारी परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर, जिंतूरच्या तहसीलदार शितल कच्छवे व नायब तहसीलदार प्रशांत राखे हे स्थानिक प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात राहून बचावकार्याचा आढावा घेत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आबासाहेब जाधव, आयुष अधिकारी डॉ. गजानन परळीकर तसेच गटविकास अधिकारी सुभाष मानकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून आवश्यक कार्यवाही केली.

कौसडीचे सरपंच शेख मोबीन, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थांनीही बचावकार्यात मोठे योगदान दिले. परिसरातील विविध गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. अखेर अथक प्रयत्नांनंतर बालकाला बोअरवेलच्या खड्ड्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बालकाची योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

अजूनही माणुसकी जिवंत 
या दुर्घटनेची माहिती मिळताच कौसडीसह परिसरातील विविध गावांमधून नागरिक मदतीसाठी अक्षरशः धावून आले. प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी आपापल्या परीने शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेतून संकटाच्या काळात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. 

प्रशासकीय यंत्रणेच्या तत्परतेचे कौतुक
बालकाच्या रेस्क्यूदरम्यान जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. तर आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, गटविकास अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यात सहभागी झाले. प्रशासनाच्या या तत्परतेचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा डंका! डायल 112 सेवेत राज्यात प्रथम क्रमांक

हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा डंका! डायल 112 सेवेत राज्यात प्रथम क्रमांक

Hingoli Dial 112 Service: संकटात सापडलेल्या नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्यात हिंगोली जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण महाराष्ट्रात बाजी मारली आहे. डायल ११२ या आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली

Sep 01, 2026
देव तारी त्याला…! 3 दिवस चिखलाच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या 6 वर्षांच्या चिमुकलीला जीवदान

देव तारी त्याला…! 3 दिवस चिखलाच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या 6 वर्षांच्या चिमुकलीला जीवदान

Nepal Flood: पाळमधील महाप्रलयकर पुरात असंख्य लोकांचे जीव गेले. ढिगाऱ्याखाली अडकलेली एका 6 वर्षीय मुलीला शुक्रवारी बचाव पथकांनी जिवंत बाहेर काढले. सलग तीन दिवस ही चिमुरडी ढिगाऱ्याखाली अडकली होती...

Aug 31, 2026
तारापीठमधील हॉटेलला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

तारापीठमधील हॉटेलला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Tarapith Hotel fire: पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ येथील एका खाजगी हॉटेलला सोमवारी सकाळी मोठी आग लागली. हॉटेलमध्ये अडकलेल्या सात जणांचा भाजल्याने मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी

Aug 17, 2026
दैनिक  देशोन्नतीच्या वृत्तामुळे मुंबर्ईचे पथक हिंगोलीत तात्काळ दाखल

दैनिक  देशोन्नतीच्या वृत्तामुळे मुंबर्ईचे पथक हिंगोलीत तात्काळ दाखल

Hingoli Railway Bridge Problem: शहरातील खटकाळी रस्त्यावरील नवीन भूमीगत रेल्वे पुलाखाली पावसाचे पाणी साचून वाहतुकीला खोळंबा होत होता. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले होते. यासाठी मुंबईचे पथक दाखल

Aug 09, 2026
काळरात्र, नदीचे रौद्र रूप अन् 'देवदूतांचे' आगमन!; अमरावती जिल्हा शोध व बचाव पथकाने १६ जणांना दिले जीवदान

काळरात्र, नदीचे रौद्र रूप अन् 'देवदूतांचे' आगमन!; अमरावती जिल्हा शोध व बचाव पथकाने १६ जणांना दिले जीवदान

३० जुलै २०२६ च्या भयाण रात्री जिल्ह्यातील संग्रामपूर आणि राजुरा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गाच्या कोपाने १६ निष्पाप जिवांचा श्वास रोखून धरला होता.

Aug 01, 2026