Tourism Development

पोहरादेवीतील नंगारा भवन हस्तांतरण रखडले!

‘नंगारा भवन व वास्तू संग्रहालय’ अद्यापही हस्तांतरणाच्या प्रतीक्षेत आहे.

पोहरादेवीतील नंगारा भवन हस्तांतरण रखडले!

Tourism Development

मानोरा : श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पोहरादेवी-उमरी येथे शासनाच्या निधीतून पूर्ण झालेले ‘नंगारा भवन व वास्तू संग्रहालय’ अद्यापही हस्तांतरणाच्या प्रतीक्षेत आहे. बांधकाम पूर्ण होऊनही ताबा न मिळाल्याने जिल्हा परिषद आणि पोहरादेवी ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत माजी पंचायत समिती सदस्य विजय पाटील यांनी दि. ७ ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात विजय पाटील यांनी म्हटले आहे की, पोहरादेवी येथील नंगारा भवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून ते हस्तांतरणासाठी तयार आहे. मात्र, अद्यापपर्यंत हस्तांतरणाची प्रक्रिया झालेली नाही. पीडब्ल्यूडीने हस्तांतरणाचे पत्र दिल्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.

त्यामुळे हे भवन सुरू न झाल्याने जिल्हा परिषद व ग्रामपंचायत पोहरादेवी यांचा महसूल बुडत असून शासनाचा निधीदेखील वाया जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने जातीने लक्ष घालून नंगारा भवन अर्थात ‘बंजारा विरासत वास्तू संग्रहालय, पोहरादेवी’ याच्या हस्तांतरणाची त्वरित प्रक्रिया करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे बंजारा समाजाच्या संस्कृतीचे जतन करणारे हे भवन लवकरात लवकर भाविकांसाठी खुले होईल, अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, गत वर्षभरापासून नंगारा विरासत म्युझियम संग्रहालयाची देखरेख अल्फा कंपनी व्यवस्थित करीत आहे. तसेच सर्व प्रकारची स्वच्छता व सुव्यवस्था शासनाच्या नियमानुसार आणि जिल्हा सहानियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित सुरू असल्याचे रामदास हरिश्चंद्र खांडे, व्यवस्थापक, अल्फा कॉम सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. कंपनी यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

Nandgaon Gram Panchayat Corruption: औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय

Oct 04, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026