कावड यात्रा अपघात

कावड यात्रेतील चिमुकल्याला चिरडणाऱ्या ट्रकला जमावाने पेटविले.. 

Kavad Yatra Accident: भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने कावड यात्रेत सहभागी  १० वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याने त्याचा जागीच अंत झाला. जळगाव-ममुराबाद रस्त्यावरील म्हाळसादेवी मंदिरा जवळ दुर्दैवी घटना

कावड यात्रेतील चिमुकल्याला चिरडणाऱ्या ट्रकला जमावाने पेटविले.. 

Kavad Yatra Accident

 

जळगाव-ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात:  संतप्त जमावाने वाहन पेटवले

​जळगाव (Kavad Yatra Accident) : भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने कावड यात्रेत सहभागी  १० वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याने त्याचा जागीच अंत झाला. जळगाव-ममुराबाद रस्त्यावरील म्हाळसादेवी मंदिरा जवळ सोमवारी सायंकाळी ही  अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या  अपघातानंतर प्रचंड संतप्त नागरिकांनी आयशर ट्रकला पेटवन दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

​जळगावातील शनीपेठ परिसरातील गवळीवाड्यातून निघालेली कावड यात्रा म्हाळसादेवी मंदिराकडे आली होती. पूजा व दर्शन आटोपून भाविक परत जात असताना, जळगावकडून चोपड्याकडे किराणा माल घेऊन जाणाऱ्या 'ओम शांती ट्रान्सपोर्ट'च्या (MH-20-EG-3593) आयशर वाहनाने १० वर्षीय प्रबळ राजू गवळी याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहनाने बालकाला काही अंतरापर्यंत ओढत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या भीषण धडकेत प्रबळचा जागीच दुर्दैवी अंत झाला. 

​नातेवाईकांचा आक्रोश व रास्ता रोको

​अपघाताची माहिती मिळताच प्रबळचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले.  एकुलता एक मुलगा गमावल्याने गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. संतप्त नातेवाईकांनी व नागरिकांनी रस्ता रोखून धरला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाला तातडीने ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली.

​संतप्त जमावाने आयशर पेटवले, पोलिसांचा ताफा दाखल

​घटनेमुळे (Kavad Yatra Accident) संतप्त झालेल्या जमावाने किराणा मालाने भरलेल्या आयशर वाहनाला आग लावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. गर्दी पांगवताना किरकोळ धक्काबुक्कीही झाली. सायंकाळी ५ ते ६:३० वाजेदरम्यान या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

​पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलत अपघातातील आयशर चालकाला ताब्यात घेतले आहे. चालकावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेमुळे गवळीवाडा व ममुराबाद परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २० वर्षीय IT इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २० वर्षीय IT इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

महंमदवाडीत भरधाव डंपरच्या धडकेत २० वर्षीय IT इंजिनिअर हमजा इब्राहिम सरकारचा मृत्यू झाला. एक तरुण गंभीर जखमी असून डंपर चालकाला अटक करण्यात आली.

Sep 23, 2026
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला इर्टिगा कारची धडक, ४ ठार तर ६ जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला इर्टिगा कारची धडक, ४ ठार तर ६ जखमी

शहापूरच्या आटगाव येथे मुंबई-नाशिक महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. उभ्या ट्रकला धडकून चार जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले.

Sep 16, 2026
गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले, परतताना काळाचा घाला; नाशिकमध्ये इंजिनिअरचा मृत्यू

गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले, परतताना काळाचा घाला; नाशिकमध्ये इंजिनिअरचा मृत्यू

नाशिकच्या मुंबई नाका परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने ३३ वर्षीय मॅकेनिकल इंजिनिअर किरण चांगदेव नरोडे यांचा मृत्यू झाला. ट्रकचालक पसार झाला आहे.

Sep 15, 2026
पोळ्याच्या आनंदावर काळाचा क्रूर घाला; ट्रकने महिलेला चिरडले..

पोळ्याच्या आनंदावर काळाचा क्रूर घाला; ट्रकने महिलेला चिरडले..

Deori truck accident: बैलपोळ्याच्या सणाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना एका हसत्याखेळत्या कुटुंबावर काळाने अत्यंत क्रूर घाला घातला आहे.

Sep 11, 2026
गोंदियात भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू

गोंदियात भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू

Gondia Accident गोंदिया जिल्ह्यातील नागरा परिसरात भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिकअपमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर

Sep 08, 2026