रेगडी तलाठी मागणी

रेगडी येथे आठवड्यातून किमान दोन दिवस तलाठी देण्याची मागणी

Regdi Talathi Demand: रेगडी येथे तहसीलदारांनी आठवड्यातून कमाल दोन दिवस तलाठीचे कार्यालय स्थापित करण्याचे आवश्यकता मांडले. ते नागरिकांना महसूल संबंधी कामांसाठी काळजी

रेगडी येथे आठवड्यातून किमान दोन दिवस तलाठी देण्याची मागणी

Regdi Talathi Demand


तहसीलदारांनी दिले सकारात्मक आश्वासन..

घोट (Regdi Talathi Demand) : हळदवाही–रेगडी जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांची महसुली कामे सुलभ व्हावीत, यासाठी रेगडी येथे आठवड्यातून किमान दोन दिवस तलाठी उपस्थित करून दयावे अशी मागणी भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावेळी तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.विशेषत रेगडी परिसरातील नागरिकांना तलाठी कार्यालयाच्या कामांसाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने त्यांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असल्याचे सुरेश शहा यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले.

तसेच, रेगडी ग्रामपंचायतीतर्फे तलाठी कार्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने कार्यालयीन जागेची अडचणही दूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे रेगडी येथे आठवड्यातून किमान दोन दिवस तलाठी बसविण्याची मागणी त्यांनी केली. यावर तहसीलदार घोरुडे यांनी सध्या SIR कार्यक्रम सुरू असल्याने महसूल विभाग त्यामध्ये व्यस्त असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर रेगडी येथे तलाठी नियमित बसविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन त्यांनी दिले.स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर रेगडी येथे तलाठी सेवा उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संबंधित सामग्री

तहसीलदारांच्या आदेशालाही केराची टोपली; अखेर ग्रामस्थांनीच हाती घेतला रस्ते दुरुस्तीचा मोर्चा

तहसीलदारांच्या आदेशालाही केराची टोपली; अखेर ग्रामस्थांनीच हाती घेतला रस्ते दुरुस्तीचा मोर्चा

Korchi Road Protest March: दोन्ही गावांतील नागरिकांसह शाळकरी मुला-मुलींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्ता व पुलाची दुरवस्था झाल्याने दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला होता.

Aug 17, 2026
जनता दरबार उपक्रममध्ये तक्रारीच्या सोडवणूकसाठी आ. श्वेता महाले पाटील यांची अधिकाऱ्यांसह आढावा बैठक

जनता दरबार उपक्रममध्ये तक्रारीच्या सोडवणूकसाठी आ. श्वेता महाले पाटील यांची अधिकाऱ्यांसह आढावा बैठक

MLA Shweta Mahale Patil: चिखली विधानसभा मतदारसंघातील आमदार श्वेता महाले पाटील यांनी जनता दरबारात जिल्ह्यातील विविध समस्या मांडण्यावर जोर देण्याचा उपक्रम सुरू केला.

May 28, 2026