आमदार श्वेता महाले पाटील

जनता दरबार उपक्रममध्ये तक्रारीच्या सोडवणूकसाठी आ. श्वेता महाले पाटील यांची अधिकाऱ्यांसह आढावा बैठक

MLA Shweta Mahale Patil: चिखली विधानसभा मतदारसंघातील आमदार श्वेता महाले पाटील यांनी जनता दरबारात जिल्ह्यातील विविध समस्या मांडण्यावर जोर देण्याचा उपक्रम सुरू केला.

जनता दरबार उपक्रममध्ये तक्रारीच्या सोडवणूकसाठी आ. श्वेता महाले पाटील यांची अधिकाऱ्यांसह आढावा बैठक

MLA Shweta Mahale Patil

चिखली (MLA Shweta Mahale Patil) : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तहसील कार्यालय, चिखली येथे जनता दरबार आयोजित करण्याचा उपक्रम सुरू केला असून मे महिन्यात झालेल्या पहिल्या जनता दरबारात प्राप्त सुमारे २५० तक्रारींच्या सोडवणुकीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी नुकतीच २७मे रोजी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केली. जनतेच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

या उपक्रमाची सुरुवात मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी तहसील कार्यालय, चिखली येथे पार पडलेल्या पहिल्या जनता दरबाराने झाली. या दरबारात मतदारसंघातील विविध भागांतून नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांसह समाजातील विविध घटकांनी आपल्या समस्या थेट आमदारांसमोर मांडल्या. जमीन, पाणी, रस्ते, वीज, शासकीय योजनांचा लाभ तसेच महसूल विभागाशी संबंधित अडचणी अशा विविध स्वरूपाच्या तब्बल २५० च्या जवळपास तक्रारी या दरबारात प्राप्त झाल्या. पहिल्याच दरबारात इतक्या मोठ्या संख्येने तक्रारी येणे हे या उपक्रमाची नितांत गरज आणि महत्त्व अधोरेखित करते.

पहिल्या जनता दरबारात प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची प्रभावीपणे व वेळेत सोडवणूक व्हावी, यासाठी आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी तातडीने पुढाकार घेत तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली. या बैठकीत प्रत्येक तक्रारीवर काय कार्यवाही झाली, संबंधित विभागाने त्यावर काय निर्णय घेतला आणि तक्रारदार नागरिकाला न्याय मिळाला की नाही, याबाबत आमदारांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर विचारणा केली. कोणत्या तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत, त्या का प्रलंबित आहेत आणि त्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचाही त्यांनी (MLA Shweta Mahale Patil) बारकाईने आढावा घेतला.

विशेष म्हणजे, आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट व कठोर शब्दांत आदेश दिले की, पहिल्या जनता दरबारात प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचा निपटारा दुसरा जनता दरबार होण्यापूर्वीच, म्हणजेच १ जून २०२६ पूर्वी करण्यात यावा. एकही तक्रार शिल्लक राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी बजावले. तक्रारींची वेळेत सोडवणूक न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आमदारांच्या या कठोर व जागरूक भूमिकेमुळे प्रशासनात एक नवी कार्यतत्परता निर्माण झाली असून जनतेच्या तक्रारींना प्राधान्याने हाताळले जात आहे.

१ जून रोजी दुसरा जनता दरबार, नागरिकांना आवाहन 

या उपक्रमाची पुढील कडी म्हणून दुसरा जनता दरबार दिनांक १ जून २०२६ (सोमवार) रोजी तहसील कार्यालय, चिखली येथे आयोजित करण्यात आला आहे. मतदारसंघातील ज्या नागरिकांच्या कोणत्याही प्रकारच्या शासकीय तक्रारी, अडचणी किंवा समस्या प्रलंबित आहेत, त्यांनी या जनता दरबारात आपल्या तक्रारी घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केले आहे. कोणताही नागरिक या सुविधेपासून वंचित राहू नये, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी सुरू केलेला हा जनता दरबाराचा उपक्रम म्हणजे लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचा एक प्रभावी व अनुकरणीय प्रयत्न आहे. तक्रारी स्वीकारणे एवढ्यापुरतेच न थांबता त्यांचा ठराविक मुदतीत निपटारा करण्याचा आग्रह धरणे आणि त्यासाठी अधिकाऱ्यांची थेट जबाबदारी निश्चित करणे, हे आमदार श्वेता महाले पाटील यांच्या कार्यशैलीचे वेगळेपण अधोरेखित करते. सामान्य माणसाच्या समस्या सरकार दरबारी पोहोचाव्यात आणि त्यांचे त्वरित निराकरण व्हावे, या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम चिखली विधानसभा मतदारसंघात एक नवा आदर्श निर्माण करत आहे...

संबंधित सामग्री

जिल्हास्तरीय व्हीजेएनटी मतदारसंघातून जालिंदर बुधवत अविरोध..

जिल्हास्तरीय व्हीजेएनटी मतदारसंघातून जालिंदर बुधवत अविरोध..

Jalindar Budhwat: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) या जिल्हास्तरीय मतदारसंघातून जालिंदर बुधवत यांची अविरोध निवड झाली.

Aug 13, 2026
उत्कृष्ट नियोजनावर राजकीय सावळ्या-गोंधळाचे सावट

उत्कृष्ट नियोजनावर राजकीय सावळ्या-गोंधळाचे सावट

Risod Samadhan Shibir: कोणताही सामाजिक, राजकीय किंवा शैक्षणिक कार्यक्रम असो; कार्यक्रमाची शिस्त, स्वरूप आणि प्रोटोकॉल पाळणे हे त्याचे सौंदर्य असते.  येथील विश्व लॉन येथे महसूल प्रशासनाच्या वतीने

Jul 28, 2026
​पी. एम. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भव्य पालखी सोहळा उत्साहात

​पी. एम. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भव्य पालखी सोहळा उत्साहात

Ashadhi Ekadashi Celebration: द्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार व भारतीय सांस्कृतिक परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने पी. एम. पब्लिक स्कूल, रिसोड तालुक्यातील आगरवाडी येथे आषाढी एकादशी

Jul 25, 2026
अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर

Ajit Pawar jayanti: लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव फरहान अमीन यांच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

Jul 22, 2026
महाराजस्व अभियान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराजस्व अभियान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Hingoli Maharajswa Abhiyan: हिंगोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान आणि मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले

Jul 22, 2026