Sword Attack

बीडमध्ये शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष; पुतण्याच्या तलवारीच्या हल्ल्यात चुलत्याचे बोट छाटले, चुलत भाऊ गंभीर जखमी

बीड जिल्ह्यातील रुई शहाजानपूर येथे शेतीच्या मालकी आणि विक्रीच्या वादातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

बीडमध्ये शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष; पुतण्याच्या तलवारीच्या हल्ल्यात चुलत्याचे बोट छाटले, चुलत भाऊ गंभीर जखमी

Sword Attack

रुई शहाजानपूर येथील घटना; चार जणांविरोधात गुन्हा दाखल, मात्र आरोपी अद्याप फरार

बीड (Sword Attack) : बीड जिल्ह्यातील रुई शहाजानपूर येथे शेतीच्या मालकी आणि विक्रीच्या वादातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक वादाने हिंसक वळण घेतल्याने पुतण्याने तलवारीने चुलत्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांच्या हाताचे बोट छाटल्याची घटना घडली. याच हल्ल्यात चुलत भाऊही गंभीर जखमी झाला असून या घटनेचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामू सोपान घुमरे यांच्या मालकीची रुई शहाजानपूर येथे चार एकर शेती आहे. या जमिनीच्या विक्रीच्या मुद्द्यावरून घुमरे कुटुंबात आणि भावकीत दीर्घकाळापासून वाद सुरू होता. हा वाद अखेर टोकाला पोहोचल्यानंतर पुतण्या अतुल घुमरे याने तलवारीने रामू घुमरे यांच्यावर हल्ला करून त्यांच्या हाताचे बोट छाटले. तसेच चुलत भाऊ बाळासाहेब घुमरे यांच्यावरही तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

हल्ल्यानंतर दोन्ही जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयासह एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सुमारे आठवडाभर उपचार घेतल्यानंतर दोघांनाही घरी सोडण्यात आले.

२४ जून रोजी घडलेल्या या घटनेनंतर जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार पूर्ण झाल्यावर रात्री उशिरा बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होऊनही अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित आरोपींना तातडीने अटक करून न्याय मिळावा, अशी मागणी जखमींच्या कुटुंबीयांनी केली आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026