Sub-District Hospital

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिसला मनाई!

रात्री ९ वाजता उपजिल्हा रुग्णालयाला भेट; बेड वाढविण्यासह दिव्यांगांच्या तपासणीचा घेतला आढावा

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिसला मनाई!

नियमभंग झाल्यास नोटीस बजावणार; जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय बिरासदार यांचा स्पष्ट इशारा

मलकापूर : शासकीय सेवेत कार्यरत असताना डॉक्टरांनी स्वतःचे खासगी रुग्णालय चालवू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून नियमभंग करणाऱ्या डॉक्टरांवर नोटीसची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय बिरासदार यांनी दिला.

मंगळवारी (दि. ११) रात्री सुमारे ९ वाजता त्यांनी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील आरोग्य सुविधा, डॉक्टरांची उपस्थिती, दिव्यांग रुग्णांची तपासणी, बेडची उपलब्धता तसेच अन्य व्यवस्थेचा आढावा घेतला.

उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांकडून शासकीय सेवेसोबत खासगी रुग्णालय अथवा खासगी प्रॅक्टिस केली जात असल्याच्या अनुषंगाने यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर शासकीय सेवेत असताना स्वतःचे खासगी रुग्णालय चालविण्यास मनाई असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक बिरासदार यांनी स्पष्ट केले.

संबंधित डॉक्टरांना यापूर्वीही याबाबत सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित डॉक्टरांना नोटीस बजावून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

रुग्णसंख्येच्या तुलनेत बेड अपुरे

मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध बेडच्या तुलनेत रुग्णसंख्या अधिक असल्याने बेडची कमतरता जाणवत असल्याचा मुद्दा यावेळी समोर आला. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बिरासदार यांनी दिली. बेडची संख्या वाढल्यास रुग्णांना उपचारासाठी अधिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

दिव्यांग तपासणीच्या वेळेवरही प्रश्न

दर बुधवारी दिव्यांग रुग्णांच्या तपासणीसाठी येणाऱ्या डॉक्टरांच्या उपस्थितीच्या वेळेबाबतही यावेळी चर्चा झाली. संबंधित डॉक्टरांनी निर्धारित वेळेत रुग्णालयात उपस्थित राहून दिव्यांग रुग्णांची तपासणी पूर्ण करावी, याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्पष्ट केले.

सुविधांचा विस्तार करण्यावर भर

उपजिल्हा रुग्णालयातील उपलब्ध आरोग्य सुविधांमध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी उपलब्ध मनुष्यबळ तसेच पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रात्रीच्या सुमारास झालेल्या या भेटीत रुग्णालयातील विविध समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षा थेट प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. डॉक्टरांची उपस्थिती, खासगी प्रॅक्टिसचा मुद्दा, बेडची उपलब्धता आणि दिव्यांग रुग्णांच्या तपासणीची वेळ या बाबींवर जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि रुग्णांना त्याचा मिळणारा लाभ याकडे आता मलकापूरकरांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

अमेरिकेचा मोठा निर्णय; भारतातील औषधांवरील अतिरिक्त शुल्क रद्द!

अमेरिकेचा मोठा निर्णय; भारतातील औषधांवरील अतिरिक्त शुल्क रद्द!

Medicines Zero percent duty: अमेरिकेने भारतासह 20 देशांतून आयात होणाऱ्या काही विशेष औषधे आणि त्यांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांवरील ‘अ‍ॅड व्हॅलोरम’ शुल्कातून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 01, 2026
मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

बुलढाण्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त यादीत; ‘ट्रिगर-१’ लागू. आमदार चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश.

Sep 26, 2026
श्री गणेश विसर्जनासाठी मलकापूर शहर पोलिसांचे आवाहन

श्री गणेश विसर्जनासाठी मलकापूर शहर पोलिसांचे आवाहन

Malkapur Ganesh Visarjan: श्री गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात, यासाठी मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळे तसेच नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना..

Sep 24, 2026
मलकापूरच्या सत्यम चौकातील नगरपालिका संकुल अतिक्रमणाच्या विळख्यात

मलकापूरच्या सत्यम चौकातील नगरपालिका संकुल अतिक्रमणाच्या विळख्यात

मलकापूरच्या सत्यम चौकातील नगरपालिका संकुलात अतिक्रमणामुळे पार्किंगची समस्या वाढली असून, रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होत आहे.

Sep 13, 2026
मलकापूरच्या सत्यम चौकातील नगरपालिका संकुल अतिक्रमणाच्या विळख्यात

मलकापूरच्या सत्यम चौकातील नगरपालिका संकुल अतिक्रमणाच्या विळख्यात

मलकापूरच्या सत्यम चौकातील नगरपालिका संकुलात अतिक्रमणामुळे पार्किंगची समस्या वाढली असून, रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होत आहे.

Sep 13, 2026