Student Assault

अहिल्यानगरात धक्कादायक प्रकार! ८ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रिन्सिपलकडून अमानुष छळ; गळा दाबून हवेत उचलले, हाताचा घेतला चावा

​​​​​​​अहिल्यानगर शहराजवळील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहिल्यानगरात धक्कादायक प्रकार! ८ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रिन्सिपलकडून अमानुष छळ; गळा दाबून हवेत उचलले, हाताचा घेतला चावा

Student Assault

बालन्याय कायद्यान्वये प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे यांच्याविरोधात गुन्हा; पालकांकडून कठोर कारवाईची मागणी

अहिल्यानगर शहराजवळील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिसरीत शिक्षण घेणाऱ्या अवघ्या ८ वर्षीय विद्यार्थ्याला शाळेच्या प्रिन्सिपलने कथितपणे अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्याचा गळा दाबून त्याला सुमारे २० सेकंद हवेत उचलून धरणे आणि त्याच्या हाताचा चावा घेणे, असा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात शाळेचे प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे यांच्याविरोधात बालन्याय (Juvenile Justice Act) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पीडित विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

वर्गातील वादानंतर घडला प्रकार

माहितीनुसार, शाळेत वर्ग सुरू असताना काही विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले होते. ही बाब संबंधित ८ वर्षीय विद्यार्थ्याने वर्गशिक्षिका ज्योती मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर वर्गशिक्षिकेने प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे यांना वर्गात बोलावले.

वर्गात आल्यानंतर प्रिन्सिपलने भांडण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कान पिळले. त्यानंतर "भांडण कसे करतात ते दाखवतो," असे म्हणत त्यांनी संबंधित विद्यार्थ्याचा गळा पकडून त्याला वर उचलले. एक ते वीस आकडे मोजेपर्यंत, म्हणजे सुमारे २० सेकंद, त्याला हवेतच धरून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर खाली सोडल्यानंतर विद्यार्थ्याच्या हाताचा जोरात चावा घेतल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घरी गेल्यानंतर उघडकीस आला प्रकार

विद्यार्थी घरी परतल्यानंतर त्याच्या शरीरावरील खुणा आणि बदललेली मानसिक अवस्था पाहून पालकांना संशय आला. त्यांनी तातडीने मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पालकांनी प्रिन्सिपलशी दूरध्वनीवर संपर्क साधून जाब विचारला.

तक्रारीनुसार, त्यावेळी प्रिन्सिपलने "माझ्याकडून चुकीने ही घटना घडली आहे. मी लेखी माफीनामा पाठवतो, मला तुमचा पत्ता द्या," असे सांगून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कठोर शिक्षेची पालकांची मागणी

निष्पाप बालकावर झालेला हा कथित अमानुष छळ अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून संबंधित प्रिन्सिपलवर कठोरात कठोर कारवाई करून जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडित विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी केली आहे. या घटनेनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026