SVM अभ्यासिकेचा आणखी एक यशस्वी टप्पा; अजय किशोर नेवरे यांची हिंगोली पोलिस दलात निवड

स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवेकडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असलेल्या SVM अभ्यासिकेने आणखी एक यश आपल्या नावावर नोंदवले आहे.

SVM अभ्यासिकेचा आणखी एक यशस्वी टप्पा; अजय किशोर नेवरे यांची हिंगोली पोलिस दलात निवड

Student Achievement

आमदार श्वेता महाले यांच्या संकल्पनेतील अभ्यासिकेतून आतापर्यंत तीन विद्यार्थी शासकीय सेवेत

चिखली (Student Achievement) : स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवेकडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असलेल्या SVM अभ्यासिकेने आणखी एक यश आपल्या नावावर नोंदवले आहे. अभ्यासिकेतील विद्यार्थी अजय किशोर नेवरे यांची हिंगोली पोलिस दलात निवड झाली असून, या यशामुळे अभ्यासिकेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून अजय किशोर नेवरे हे SVM अभ्यासिकेत नियमित अभ्यास करत होते. सातत्य, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले. त्यांच्या निवडीमुळे अभ्यासिकेतील इतर विद्यार्थ्यांनाही नवी प्रेरणा मिळाली आहे.

विशेष म्हणजे, SVM अभ्यासिका सुरू झाल्यापासून आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड झाली आहे. त्यामुळे ही अभ्यासिका केवळ अध्ययनाचे केंद्र न राहता, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारे यशस्वी व्यासपीठ ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ही अभ्यासिका आमदार श्वेता महाले यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आली असून, ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल वातावरण, प्रेरणा आणि दिशा मिळावी, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. आज त्या संकल्पनेचे सकारात्मक परिणाम समोर येताना दिसत आहेत.

अजय किशोर नेवरे यांच्या निवडीबद्दल आमदार श्वेता महाले यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांच्या बळावर यश मिळवावे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. तसेच, SVM अभ्यासिकेचे संचालक शुभम तुपकर यांनी अजय नेवरे यांचा सत्कार केला. अभ्यासिकेतील इतर विद्यार्थ्यांनीही अजयच्या यशाचा आनंद साजरा करत जल्लोष केला. अभ्यासिकेमध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत असताना, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

अजय नेवरे यांच्या यशामुळे SVM अभ्यासिका ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा विश्वासार्ह केंद्रबिंदू ठरत आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. योग्य सुविधा, शांत वातावरण आणि प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठे यश मिळवू शकतात, याचे हे ठळक उदाहरण मानले जात आहे. अजय किशोर नेवरे यांच्या निवडीमुळे त्यांच्या कुटुंबासह SVM अभ्यासिका परिवारात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात आणखी अनेक विद्यार्थी या अभ्यासिकेतून शासकीय सेवेत झळकतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

SVM अभ्यासिकेचे माध्यमातून अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत झळकतील - आमदार श्वेता महाले 

SVM अभ्यासिका ही केवळ अभ्यासाची जागा नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे प्रेरणास्थान आहे. अजय किशोर नेवरे यांची हिंगोली पोलिस दलात झालेली निवड ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. जिद्द, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठे यश संपादन करू शकतात, हे अजयने सिद्ध करून दाखवले आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. भविष्यातही SVM अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत झळकतील, असा मला विश्वास आहे.

SVM अभ्यासिकेची यशाची हॅट्ट्रिक

अवघ्या आठ महिन्यांत SVM अभ्यासिकेतील तीन विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत स्थान मिळवत अभ्यासिकेच्या कार्याची प्रभावी छाप उमटवली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका प्रेरणादायी केंद्र ठरत असून, येथे मिळणारे अभ्यासाचे वातावरण, योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांच्या यशाचा मार्ग अधिक सुकर होत आहे. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी SVM अभ्यासिका ही आता आशेचा किरण आणि यशाची खात्री देणारे व्यासपीठ बनत असल्याचे चित्र दिसत आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026