ST Reservation

पोहरादेवीत बंजारा समाजाचे एसटी आरक्षणासाठी सामूहिक आमरण उपोषण सुरू

पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी ९ आंदोलनकर्त्यांचे सामूहिक आमरण उपोषण सुरू झाले असून, सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पोहरादेवीत बंजारा समाजाचे एसटी आरक्षणासाठी सामूहिक आमरण उपोषण सुरू

ST Reservation

सरकारने सकारात्मक दखल घ्यावी; अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा

मानोरा : गोर बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाच्या मागणीसाठी पोहरादेवी येथे १३ सप्टेंबरपासून राज्यातील विविध जिल्ह्यांतील ९ आंदोलनकर्त्यांनी सामूहिक आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

बंजारा समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तीर्थक्षेत्र पोहरादेवी हे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असून, याच ठिकाणाहून आरक्षणाच्या हक्कासाठी आंदोलनाची दिशा अधिक व्यापक करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

सरकारने या आमरण उपोषणाची आणि एसटी आरक्षणाच्या मागणीची सकारात्मक दखल घेऊन ठोस भूमिका जाहीर करावी. अन्यथा आगामी काळात आंदोलन महाराष्ट्रभर अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी शासनाला दिला आहे.

या सामूहिक आमरण उपोषणाला संजय महाराज (पोहरादेवी), श्रीकांत राठोड (जालना), सतीश पवार (बीड), सुरेश राठोड (हिंगोली), नामदेव राठोड (औंढा नागनाथ), दिनकर राठोड (पुसद), रमेश उर्फ सोनू पवार (उमरीगड), अंकुश राठोड (बुलढाणा) आणि जयसिंग राठोड (आर्णी) आदींनी सुरुवात केली आहे.

उपोषणाच्या पहिल्या दिवशी धर्मगुरू जितेंद्र महाराज, धर्मगुरू कबीरदास महाराज, जयकिसन राठोड, भाऊ नाईक, युवा नेते इंदल भोला राठोड आदींसह गोर बंजारा समाजातील अनेक नेत्यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला.

बंजारा समाजाचा एसटी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, आता शासन या आंदोलनाची दखल किती गांभीर्याने घेते, याकडे संपूर्ण देशासह राज्यातील बंजारा समाज बांधवांचे लक्ष लागले आहे.

 

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026