ST Bus Theft

जळगाव जिल्ह्यातील जामनेर आगारातून नवी कोरी ST बस चोरीला; पंचर झाल्याने चोरट्यांचा डाव फसला

जळगाव जिल्ह्यातील जामनेर आगारातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (ST) नवी कोरी बसच अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर आगारातून नवी कोरी ST बस चोरीला; पंचर झाल्याने चोरट्यांचा डाव फसला

ST Bus Theft

मध्यरात्री २ वाजता बस पळवली; शहापूरजवळ रस्त्याच्या कडेला बस सोडून चोरटे पसार

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर आगारातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (ST) नवी कोरी बसच अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री आगारातून बस चोरीला गेल्याने एसटी महामंडळासह परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरी करून नेलेल्या बसचे शहापूर गावाजवळ एक चाक पंचर झाल्याने चोरट्यांचा डाव फसला.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर आगारात उभी असलेली नवी कोरी एसटी बस अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री सुमारे २ वाजता पळवून नेली. बस आगारातून गायब झाल्याचे लक्षात येताच प्रशासनाची धावपळ उडाली. विशेष म्हणजे, बस चोरीची संपूर्ण घटना आगारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे चोरट्यांनी आगारातून बस नेण्यासाठी नेमकी कोणती पद्धत वापरली, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

पंचर झाल्याने चोरट्यांचा डाव फसला

आगारातून बस घेऊन पसार झाल्यानंतर चोरटे जामनेर तालुक्यातील शहापूर गावाजवळ पोहोचले. मात्र, याच ठिकाणी चोरीच्या बसचे एक चाक अचानक पंचर झाले. त्यामुळे चोरट्यांना बस पुढे नेता आली नाही. अखेर त्यांनी बस रस्त्याच्या कडेला सोडली आणि अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला.

सकाळी बस पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी

शहापूर गावाजवळ रस्त्याच्या कडेला लालपरी उभी असल्याचे सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आले. नवी कोरी एसटी बस असल्याने ती पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.

दरम्यान, थेट एसटी आगारातूनच मध्यरात्री बस चोरीला गेल्याने जामनेर एसटी आगाराच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, बस पळवून नेणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
ST प्रवाशांसाठी मोठी अपडेट! महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य

ST प्रवाशांसाठी मोठी अपडेट! महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य

१ ऑक्टोबरपासून ST सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य होणार. महिला व ज्येष्ठ नागरिकांना QR पावती, BHIM App आणि OTPची सुविधाही मिळणार.

Sep 29, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026