ST Bus Fire

येलदरी-खंडाळा घाटात धावत्या एसटी बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास येलदरी-खंडाळा घाटात धावत असताना अचानक इंजिनच्या बोनेटमधून धूर निघू लागला.

येलदरी-खंडाळा घाटात धावत्या एसटी बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

ST Bus Fire

वाशिम : पुसद ते वाशिम मार्गावरील मानव विकास योजनेची एसटी बस मंगळवारी (दि. १४) सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास येलदरी-खंडाळा घाटात धावत असताना अचानक इंजिनच्या बोनेटमधून धूर निघू लागला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १४ बीटी ४५५० क्रमांकाची एसटी बस पुसदहून वाशिमकडे जात होती. चालक विजय श्रीराम मोरे यांनी धूर दिसताच तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर वाहक अमोल किसन कानपुरे यांच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बसमधून खाली उतरविण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला तसेच चालक-वाहकाला कोणतीही दुखापत झाली नाही.

दरम्यान, आगीमुळे बसची समोरील मोठी काच, केबिनच्या काचा, इंजिनचे बोनेट, चालकाच्या सीटजवळील स्टेअरिंग पाईपलाईन तसेच व्हिस्कस जळून अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच पुसद अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. अशी माहिती पुसद आगाराचे आगार व्यवस्थापक विवेक बनसोड यांनी दिली.

संबंधित सामग्री

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026