Solapur Murder

एकतर्फी प्रेमातून सोलापुरात रक्तरंजित शेवट; प्रेयसीच्या पतीची कोयत्याने निर्घृण हत्या, १९ वर्षीय आरोपी अटकेत

सोलापुरात एकतर्फी प्रेमातून उद्भवलेल्या संतापाचे भीषण रूप समोर आले आहे.

एकतर्फी प्रेमातून सोलापुरात रक्तरंजित शेवट; प्रेयसीच्या पतीची कोयत्याने निर्घृण हत्या, १९ वर्षीय आरोपी अटकेत

Solapur Murder

अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील कंपनीसमोर रात्रीची थरारक घटना; लग्नाचा राग मनात ठेवून आरोपीने रचला कट

सोलापुर (Solapur Murder) : सोलापुरात एकतर्फी प्रेमातून उद्भवलेल्या संतापाचे भीषण रूप समोर आले आहे. प्रेयसीचे दुसऱ्याशी लग्न झाल्याचा राग मनात धरून एका १९ वर्षीय तरुणाने तिच्या पतीवर धारदार कोयत्याने सपासप वार करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेत सिद्धाराम कैलास कटप (वय २०, व्यवसाय – रिक्षाचालक) यांचा मृत्यू झाला. तर संतोष महादेव पाटील (वय १९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील एका कंपनीसमोर रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धाराम आणि संतोष हे दोघेही एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. परिसरातील एका तरुणीवर संतोषचे एकतर्फी प्रेम होते. त्याने संबंधित तरुणीला विवाहासाठी मागणीही घातली होती. मात्र, तिने त्याचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर २० एप्रिल रोजी त्या तरुणीचा विवाह सिद्धाराम कटप याच्यासोबत झाला.

या विवाहानंतर संतोषच्या मनात सिद्धारामविषयी तीव्र राग आणि सूडाची भावना निर्माण झाली होती. त्यातूनच त्याने सिद्धारामला फोन करून अक्कलकोट रोड परिसरात भेटण्यासाठी बोलावले. दोघांमध्ये झालेला वाद काही वेळातच उग्र झाला. त्यानंतर संतोषने सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने सिद्धारामवर वारंवार हल्ला केला.

या हल्ल्यात सिद्धाराम गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026