चिखली (Sinnar Terrible Accident) : चिखली तालुक्यातील खैरव येथील तीन युवकांचा सिन्नर (जि. नाशिक) येथे (Sinnar Terrible Accident) भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २५ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास सिन्नर एमआयडीसी परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, खैरव येथील वैभव रामदास शिंदे यांच्या जेसीबीसाठी साहित्य आणण्यासाठी वैभव शिंदे, चालक श्रीकिसन हनुमान सुरुशे (रा. पाटोदा) व संकेत प्रकाश खोसे (रा. खैरव) हे तिघे सियाज कारने सिन्नर येथे गेले होते. दरम्यान, सिन्नर एमआयडीसी परिसरात उभ्या असलेल्या कंटेनरला त्यांच्या कारची जोरदार धडक बसल्याने हा (Sinnar Terrible Accident) भीषण अपघात झाला. या अपघातात संकेत प्रकाश खोसे व श्रीकिसन हनुमान सुरुशे यांचा जागीच मृत्यू झाला. तर वैभव रामदास शिंदे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्यांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच खैरव गावाचे सरपंच गजानन शिंदे यांच्यासह नातेवाईकांनी तात्काळ सिन्नरकडे धाव घेतली. दरम्यान, संकेत खोसे यांच्यावर २६ एप्रिल रोजी सकाळी खैरव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून श्रीकिसन सुरुशे व वैभव शिंदे यांचे मृतदेह गावात येणे बाकी असल्याची माहिती मिळाली आहे. या (Sinnar Terrible Accident) दुर्दैवी घटनेमुळे खैरव गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सिन्नरजवळ भीषण अपघात; खैरव येथील तीन युवकांचा मृत्यू
Sinnar Terrible Accident: चिखली तालुक्यातील खैरव येथे राहणाऱ्या तीन युवकांचा सिन्नरमध्ये अपघातात मृत्यू झाला. या तिघांची कार कंटेनरला धडकून अपघात झाला. गावातील लोकांमध्ये शोककळा पसरली.
Sinnar Terrible Accident
संबंधित सामग्री
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी
नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना
Chondiamba Armed Attack Death: वसमत तालुक्यातील चोंडी आंबा टी-पॉईंटवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आवारात ६ ऑक्टोबर मंगळवार रोजी धारदार शस्त्राने हल्ला
अविनाश बांगरच्या शौर्याचा शेवट; दुसर्यासाठी जीव दिला: स्वत काळाच्या पडद्या आड गेला
Avinash Bangar's death: हिंगोली येथे फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगी अविनाश काशिनाथ बांगर यांनी दुसर्यांचे प्राण वाचवण्यासाठी धाव घेतली आणि या प्रयत्नातच त्यांनी स्वतःचा प्राण गमावला.
सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...
India Smoking Deaths: सिगारेट ओढणारी व्यक्ती स्वतःच्या आरोग्याला धोका निर्माण करतेच; मात्र तिच्या आसपास असलेल्या धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ
Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..