आमदार श्वेता महाले पाटील

महावितरणच्या कामांचा आमदार श्वेता महाले पाटील यांनी घेतला कठोर आढावा

MLA Shweta Mahale Patil: आमदार श्वेता महाले पाटील यांनी बुलडाणा येथे वीज पुरवठा व दर्जेदार वीज मिळावी यासाठी स्पष्ट सूचना दिल्या. शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये म्हणून कठोर पाऊले उचलली.

महावितरणच्या कामांचा आमदार श्वेता महाले पाटील यांनी घेतला कठोर आढावा

MLA Shweta Mahale Patil

 

शेतकरी व सर्वसामान्यांना दर्जेदार वीज मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना दिल्या स्पष्ट सूचना

चिखली (MLA Shweta Mahale Patil) : विधानसभा मतदारसंघातील वीज पुरवठा व वीजविषयक विविध कामांची प्रगती जाणून घेण्यासाठी आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बुलडाणा येथे एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. मतदारसंघातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना सुरळीत व दर्जेदार वीज मिळावी यासाठी आमदार महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना अत्यंत स्पष्ट आणि कठोर सूचना दिल्या.

मान्सूनपूर्वी वीजयंत्रणा सुदृढ करण्याचे आदेश 

पावसाळा जवळ आलेला असताना वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी आधीच काय तयारी केली आहे, याचा आमदारांनी कसून आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी, जुने व खराब खांब बदलणे, तारा व्यवस्थित करणे, रोहित्रांची दुरुस्ती व तपासणी या सर्व कामांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. ही सर्व कामे ठरलेल्या वेळेत व ठरलेल्या खर्चाच्या मर्यादेत पूर्ण व्हायला हवीत, यात कोणतीही हयगय चालणार नाही, असे (MLA Shweta Mahale Patil) आमदारांनी ठणकावले.

चिखली, उदयनगर व धाड परिसरात सुरू असलेल्या वीज वितरण सुधारणा, वीजगळती कमी करणे, शेतीला स्वतंत्र वीजपुरवठा, नवीन वीज उपकेंद्रे उभारणे यांसह मतदारसंघातील सर्व वीजविषयक कामांची प्रत्यक्ष स्थिती, सध्या येणाऱ्या अडचणी आणि ती कामे पूर्ण होण्याचा अपेक्षित कालावधी याबाबत आमदारांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. कामे रखडणार नाहीत याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे, असे त्यांनी (MLA Shweta Mahale Patil) स्पष्ट केले.

बुलडाणा तालुक्यातील म्हसला येथे जवळपास दोन वर्षांपूर्वी नवीन वीज उपकेंद्रास शासनाची मंजुरी मिळाली आहे. मात्र जागेचा प्रश्न अद्याप निकाली न निघाल्याने प्रत्यक्ष काम अजून सुरू झालेले नाही. या विलंबामुळे परिसरातील शेतकऱ्यांना वारंवार वीज जाणे, कमी दाबाने वीज येणे अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याचा थेट फटका शेतीपिकांना बसत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आमदार महाले पाटील यांनी या शेतकऱ्यांची व्यथा बैठकीत तीव्रतेने मांडत हे उपकेंद्र तातडीने सुरू करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले.

चिखली विधानसभा मतदारसंघातील वीज उपकेंद्राचे काम सध्या ठप्प असल्याची बाब आमदारांनी बैठकीत ठासून मांडली. हे काम तातडीने पुन्हा सुरू करण्यात यावे, असे आदेश देताना मतदारसंघातील सर्व मंजूर वीज उपकेंद्रांची कामे गतीने पुढे न्यावीत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. गावांमध्ये नवीन खांब टाकणे व तारा ओढण्याच्या कामासाठी सर्वसामान्य नागरिकांनी स्वतः पैसे उभे करण्याची गरज नाही, या कामातून महावितरणाला स्वतःलाही उत्पन्न मिळते. त्यामुळे ही कामे महावितरणानेच तातडीने करावीत, अशी रोखठोक भूमिका आमदारांनी मांडली 

टाकारखेड हेलगा येथे लोकेश देशमुख यांच्या शेतातील वीज जोडणीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि त्यात कंत्राटदार पैशांची मागणी करत असल्याची तक्रार बैठकीत मांडण्यात आली. या प्रकाराची आमदार महाले पाटील यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली. सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून असे बेकायदेशीरपणे पैसे उकळणे कदापि खपवून घेतले जाणार नाही, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा (MLA Shweta Mahale Patil) आमदारांनी स्पष्ट शब्दांत दिला.

यावेळी आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी सांगितले की, माझ्या मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक गाव यांना वर्षभर चांगला वीजपुरवठा मिळणे हे माझे प्राथमिक कर्तव्य आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण झाली नाहीत तर जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे वेळ न दवडता सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, असे मी अधिकाऱ्यांना बजावले आहे. जनतेच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

संबंधित सामग्री

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

Kurunda Farmers' Protest: भारतीय स्टेट बँक  शाखेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, सातत्याने होणाऱ्या पिळवणूक व हेळसांडीला कंटाळून ७ ऑक्टोबर बुधवार रोजी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखा.

Oct 07, 2026
पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026