नारी शक्ती वंदन विधेयक

नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवा: शिवाजी मुटकुळे 

Nari Shakti Vandan Bill: शिवाजी मुटकुळे यांनी काँग्रेसच्या नारी शक्ती वंदन विधेयकाला केलेल्या विरोधाचा निषेध केला. त्यांनी महिलांना आपल्या हक्कांसाठी जागृत होण्याचे आवाहन केले.

नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवा: शिवाजी मुटकुळे 

Nari Shakti Vandan Bill

हिंगोली (Nari Shakti Vandan Bill) : काँग्रेस पक्षाने नेहमीच महिला सक्षमीकरणात अडथळे आणण्याचे काम केले आहे. या नारी शक्ती वंदन विधेयकाचा विरोध करून काँग्रेसने आपला महिलाविरोधी चेहरा पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे.महिलांनी आपल्या हक्कांसाठी जागृत होऊन या विधेयकाला विरोध करणाऱ्यांना काँग्रेसला धडा शिकवावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने महिलांना संसदेत आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देणारा ऐतिहासिक 'नारी शक्ती वंदन अधिनियम' मंजूर केला आहे. मात्र, या विधेयकाला काँग्रेस पक्षाने घेतलेल्या नकारात्मक भूमिकेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा, हिंगोली जिल्ह्याच्या वतीने भांडेगाव येथे निदर्शने करण्यात आली.
महिला आरक्षणास (Nari Shakti Vandan Bill) विरोध करून विरोधकांनी आपली महिलांविरोधी मानसिकता उघड केली असून, त्याचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला. महिला आरक्षणाला अडथळे निर्माण करणारे पक्ष केवळ एका विधेयकाचा नव्हे, तर संपूर्ण स्त्रीशक्तीचा अपमान करत आहेत. हा अपमान भाजप कदापिही सहन करणार नाही. अशी तीव्र भावना यावेळी महिलांनी बोलताना व्यक्त केली. 

यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, राजामतीताई मुटकुळे, कृष्णा रुहाटिया, मंदाकिनी चव्हाण, वंदना गायकवाड, सिमा गरड, सरस्वती सोळंके, मिनाक्षी जामकर, उत्तमराव जगताप, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, संतोष जगताप, आनंदराव जगताप, गणेश शिंदे, बंडू करहाळे, श्रिरंग राठोड, भाऊराव ठाकरे, मधुकर इसाये, संतोष कापसे, भगवान घ्यार, आशिष जैस्वाल यांच्यासह  मोठ्या संख्येने महिला आणि युवती उपस्थित होत्या.आंदोलनादरम्यान काँग्रेस पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

Congress MP Varsha Gaikwad: नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड..

Oct 05, 2026
भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर; नागपूरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी

भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर; नागपूरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी

BJP Legislative Council Candidate: राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, सर्वपक्षीय मोर्चेबांधणी तीव्र. भारतीय जनता पक्षानेही तीन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली..

Oct 04, 2026