Shetkari Kamgar Paksha (PWP)

शेकाप हा वैचारिक अधिष्ठान असलेला पक्ष : प्रा. रमेश पारवे

स्वातंत्र्यपूर्व काळापासून सत्यशोधक विचार आणि मार्क्सवादी विचारांचा कडवा पुरस्कर्ता असलेला पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष, असे प्रतिपादन प्रा. रमेश पारवे यांनी केले.

शेकाप हा वैचारिक अधिष्ठान असलेला पक्ष : प्रा. रमेश पारवे

लातूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून सत्यशोधक विचार आणि मार्क्सवादी विचारांचा कडवा पुरस्कर्ता असलेला पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष, असे प्रतिपादन प्रा. रमेश पारवे यांनी केले.

शेतकरी कामगार पक्षाच्या ७९ व्या वर्धापनदिनानिमित्त लाल झेंड्यास ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी भाई उदय गवारे, कॉ. राजेंद्र विहीरे, अँड. सुरेश शिंदे आणि भाई एकनाथराव कवठेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

अँड. सुरेश शिंदे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष

अँड. सुरेश शिंदे यांची शेतकरी कामगार पक्षाच्या किसान आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील पुरोगामी विचारांचे पक्ष व संघटना यांना एकत्रित करून शासनाच्या हुकूमशाही धोरणाविरुद्ध जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पक्षातर्फे काम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा चिटणीस भाई अँड. सुशील सोमवंशी यांनी केले.

या कार्यक्रमास भाई उदय गवारे, अँड. सुशील सोमवंशी, राजेंद्र विहीरे, एकनाथराव कवठेकर, प्रा. दत्ता सोमवंशी, अँड. सुरेश शिंदे, प्रतापराव माने, अमर देशमुख, प्रा. रमेश पारवे, अँड. अजय कलशेट्टी, अँड. राहुल विहीरे, अँड. भालचंद्र कवठेकर, अँड. अनंत बावणे, प्रथमेश सावंत, सोहम कवठेकर, रवी माळी, प्रसाद ढगे, सचिन डोंबे पाटील, दानीवाल लांडगे, चिन्मय टिपके, धर्मदीप डोंगरे, प्रशांत सावंत, जैद उत्साद, अनिकेत गोलम आदी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

Kurunda Farmers' Protest: भारतीय स्टेट बँक  शाखेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, सातत्याने होणाऱ्या पिळवणूक व हेळसांडीला कंटाळून ७ ऑक्टोबर बुधवार रोजी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखा.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026