शेलगाव ॲट्रॉसिटी प्रकरण

शेलगाव जहांगीर येथील ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

Shelgaon Atrocity Case: चिखली तालुक्यातील शेलगांव जहांगीर येथील अनुसूचित जातीच्या महिलेवर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ला प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी

शेलगाव जहांगीर येथील ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

Shelgaon Atrocity Case

चिखली (Shelgaon Atrocity Case) : चिखली तालुक्यातील शेलगांव जहांगीर येथील अनुसूचित जातीच्या महिलेवर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ला प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच पीडित महिलेला न्याय व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्लोबल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. काशीराम पैठणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जुलै रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, शेलगाव जहांगीर (Shelgaon Atrocity Case) येथील ऊषा रमेश साळवे व त्यांची मुलगी प्रतीक्षा साळवे या शेतात काम करत असताना जमिनीच्या वादातून काही जणांनी त्यांच्याशी वाद घालत जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर काठ्या, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ऊषा साळवे यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच महिलेची साडी फाडून विनयभंग केल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला असला, तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपींचे मनोबल वाढत असून पीडित कुटुंब भयभीत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

डॉ. पैठणे यांनी पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, (Shelgaon Atrocity Case) प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवावा तसेच पीडित महिलेला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. निवेदनावर भाई प्रदीप अंभोरे संस्थापक अध्यक्ष भूमिमुक्ती मोर्चा, दीपक कस्तुरे, गजानन जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.

संबंधित सामग्री

नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसक घटनेत होऊन 38 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Sep 05, 2026
बीडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेट्रोल ओतून पेटवल्याचा आरोप; उपचारादरम्यान अनुष्का शिरसाट यांचा मृत्यू

बीडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेट्रोल ओतून पेटवल्याचा आरोप; उपचारादरम्यान अनुष्का शिरसाट यांचा मृत्यू

बीडच्या पिंपळनेर परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

Aug 13, 2026
पॉश कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील ६७२ कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस

पॉश कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील ६७२ कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस

POSH Act Implementation: कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम, २०१३ (पॉश अॅक्ट) मधील तरतुदी तसेच मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशांची अंमलबजावणी..

Aug 07, 2026
तुझे आंघोळ करतानाचे फोटो आहे, म्हणत महिलेचा छळ

तुझे आंघोळ करतानाचे फोटो आहे, म्हणत महिलेचा छळ

Married Women Harassment: २१ वर्षाच्या विवाहित महिला तुझा आंघोळ करताना उघडे फोटो माझ्या मोबाईलसोबत धमकी देत निघाल्याच्या आरोपावर पळून गेल्याबद्दल पोलिसांनी आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

Aug 04, 2026
टीव्ही अभिनेत्री अदिती शर्माची पतीसह सासरच्या तिघांविरोधात तक्रार; कौटुंबिक हिंसाचारासह मानसिक छळाचे गंभीर आरोप

टीव्ही अभिनेत्री अदिती शर्माची पतीसह सासरच्या तिघांविरोधात तक्रार; कौटुंबिक हिंसाचारासह मानसिक छळाचे गंभीर आरोप

टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अदिती शर्मा (वय २९) यांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर आरोप करत मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Aug 02, 2026