घोट येथे स्वतंत्र विदर्भासाठी एल्गार; महाराष्ट्र दिनी ‘काळा दिन’ पाळत आंदोलन

महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ‘काळा दिन’ पाळत घोट येथे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जोरदार एल्गार पुकारण्यात आला.

घोट येथे स्वतंत्र विदर्भासाठी एल्गार; महाराष्ट्र दिनी ‘काळा दिन’ पाळत आंदोलन

Separate Vidarbha

घोट तालुका निर्मितीची मागणी जोरात

घोट (Separate Vidarbha) :  महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ‘काळा दिन’ पाळत घोट येथे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जोरदार एल्गार पुकारण्यात आला. घोट येथील मुख्य बसस्थानक चौकात आयोजित या आंदोलनात “स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा” तसेच “घोटला तालुक्याचा दर्जा द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलनात विदर्भ राज्याच्या मागणीसोबतच स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नही ठळकपणे मांडण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ आंदोलन संघर्ष समितीचे दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार यांनी केले.

यावेळी विलास गण्यारपवार, अंनिसचे कार्याध्यक्ष आसिफ सय्यद, माजी शिक्षक रामचंद्र दुधबावरे, मोतीराम लाटेलवार, दिनकर लाकडे, रमेश श्रृंगारपवार, गिरजाशंकर उपाध्ये, बंडू जुवारे, उमेश सरकार, विश्वास सर, बाबुराव भोवरे, अनिता पोरेड्डीवार, विजयालक्ष्मी गण्यारपवार, बबलू शाहा, गिरिश उपाध्ये, जितेन शाहा, पुरुषोत्तम चलाख, उद्धव वरफडे, विशाखा सिंह, लिना विश्वास, संगीता वडेटीवार, शामराव चंदनखेडे, पिंकी मेश्राम, ललिता ठाकरे, ताराबाई बावणे, सिंधुबाई आळे, किरण पुल्लीवार, रामदास आबांडरे, सचिन साखरकर, प्रल्हाद निकोडे, आकाश उराडे आदींसह शेकडो विदर्भवादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026