Sati River

गडचिरोली हादरलं! आंघोळीसाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी तिघांचा सती नदीत बुडून मृत्यू

कुरखेडा तालुक्यातील राणी खेडेगाव येथील तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला .

गडचिरोली हादरलं! आंघोळीसाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी तिघांचा सती नदीत बुडून मृत्यू

कुरखेडा तालुक्यातील राणी खेडेगाव येथील घटना; एक विद्यार्थी बचावला, शोध पथकाची कारवाई सुरू

कुरखेडा (गडचिरोली):

कुरखेडा तालुक्यातील राणी खेडेगाव येथे आज, १ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आई-वडील धान रोवणीच्या कामासाठी शेतात गेले असताना, गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खेडेगाव येथील चार विद्यार्थी जवळील सती नदीत आंघोळीसाठी गेले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी सुदैवाने बचावला.

घटनेची माहिती मिळताच शोध पथक तसेच पुराडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

  • लक्ष्मण सुन्हेर दूधकवर (वय ६ वर्षे)
  • कुणाल रमेश दूधकवर (वय ५ वर्षे)
  • मोहित हिवराज सराटे (वय ११ वर्षे)

तिन्ही विद्यार्थी रा. खेडेगाव, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली येथील रहिवासी असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खेडेगाव येथे शिक्षण घेत होते. १ ऑगस्ट २०२६ रोजीदुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास खेडेगाव येथील सती नदीच्या पात्रात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026