कुरुंदा (Sakal Maratha Samaj) : वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ३ सप्टेंबर गुरुवार रोजी भेंडेगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन शांततेत करण्यात आले. म्हातारगाव येथील मराठा तरुण व समाज बांधवांनी एकत्र येत राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन केले. यावेळी "एक मराठा लाख मराठा", आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात म्हातारगाव व परिसरातील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी कुरुंदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन कुरुंदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार महादेव पुरी यांना दिले. मराठा आरक्षण तात्काळ लागू करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले त्यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते .