प्रतापराव जाधव

सहकारी पतसंस्थांनी होतकरू तरुणांना व महिलांना अर्थसहाय्य करून उद्योजक निर्माण करावे:  ना. प्रतापराव जाधव

Prataprav Jadhav: ना. प्रतापराव जाधव यांनी चांडोळ येथे दिव्यज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी तरुणांना व महिलांना उद्योजक बनवण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचे आवाहन केले.

सहकारी पतसंस्थांनी होतकरू तरुणांना व महिलांना अर्थसहाय्य करून उद्योजक निर्माण करावे:  ना. प्रतापराव जाधव

Prataprav Jadhav

बुलढाणा (Prataprav Jadhav) : तालुक्यातील  चांडोळ येथे दिव्यज्योती महिला अर्बन पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ना. प्रतापराव जाधव यांनी मार्गदर्शन करताना सहकारातून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा यासाठी सहकारी पतसंस्थानी समाजातील होतकरू तरुणांना व महीलांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य करुन उद्योजक निर्माण करुन समाजाच्या उत्थानासाठी कार्य करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना.श्री. प्रतापराव जाधव यांनी चांडोळ येथे दिव्यज्योती महीला सहकारी पतसंस्थेच्या चांडोळ येथील शाखा उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.चांडोळ येथे दिव्य ज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या शाखा विस्ताराच्या उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते अंकुशराव पाटील आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दिव्यज्योती महिला अर्बनच्या कार्यकारी संचालिका वर्षाताई माधव तायडे यांनी संस्थेचा आजवरच्या वाटचालीचा आढावा देत भविष्यात महिलांना उद्योगासाठी संस्था अर्थसहाय्य देण्यासाठी बांधील असून सर्वसामान्यांसाठी संस्था कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा प्रमिलाताई भरत वाघुर्डे उपाध्यक्ष सिमा अनिल कुटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले शाखा उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे देविदास पाटील, अनिल जाधव, गजानन देशमुख, राजू चांदा, विष्णू वाघ, विष्णू उगले, पुरषोत्तम भोंडे, योगेश राजपूत, दीपक टाकसाळ, चक्रधर उबाळे, सोनू तायडे, सुरेश भिवसनकर, त्याचबरोबर शिवसेना (ठाकरे ) जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, धाडचे सरपंच सावित्रीबाई बोर्डे, नंदूभाऊ सवडतकर, रामकृष्ण तायडे, शिवाजी देशमुख, दिगंबर जाधव, यशवंत सोनुने , सागर जयस्वाल, साखरे महाराज, सुरेश धनावत, दिपक धनावत, राहुल सोलंके सचिन ताटू, विजय जाधव, विनोद खडके, मराठा अर्बनचे अध्यक्ष श्रीकृष्ण जेऊघाले, नाना माळोदे, निलेश गोरे, दिनेश काळे, हरिदास गोरे, गणेश सोनुने, रामराव जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख निलेश गुजर, मयूर पडोळ, संदीप पालकर, अमोल शिंदे,  विलास गुजर, टीका खान,शालिग्राम वाघ, सईद खासाब,माणिकराव खांडवे, योगेश ताठे, अभिषेक भराड, डॉ. राजेंद्र तायडे, डॉ. प्रवीण तायडे, प्रवीण वाघ, संतोष आघाव, शकील सौदागर, अनिस जमदार, मोतीराम बिबे, देविदास जाधव, विशाल शेळके, आत्माराम नरवाडे, सिद्धू लडके, भास्कर मघाडे, बबन फेपाळे, सिद्धार्थ जाधव, शरद माळोदे, प्रमोद खोंडे,अविनाश क्षीरसागर, राजू गायकवाड, छोटू मेहेर, कैलास रोकडे, विशाल गावंडे, सुनिल महाजन,शरद पालकर, सुनील वाघ, अंकुश डुकरे, रामदास कानडजे, सागर जट्टे, शेषराव ठाकरे, दिलीपमामा जट्टे, दिलीप ब्राह्मणे, सचिन जोशी, यांच्यासह असंख्यनागरिक व महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन माधव तायडे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बबलू वाघुडे, शरद शेरे, नागेश मोहिते, ईश्वर कोप्पे, सतीश धनावत, अक्षय सोनुने, दीपक शेळके, उदय जाधव, व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
 

संबंधित सामग्री

देशातील असंघटित उद्योगांच्या टॉप १० मध्ये महाराष्ट्र ‘शून्य’; पुणे मात्र रोजगारात आघाडीवर

देशातील असंघटित उद्योगांच्या टॉप १० मध्ये महाराष्ट्र ‘शून्य’; पुणे मात्र रोजगारात आघाडीवर

ASUSE २०२५ अहवालानुसार असंघटित उद्योगांच्या टॉप १० जिल्ह्यांत महाराष्ट्राचा एकही जिल्हा नाही. पुणे रोजगारनिर्मितीत चौथे, तर सातारा उत्पन्नात देशात दुसरा.

Sep 12, 2026
मोठा निर्णय! आता तृतीयपंथीयांना मिळणार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मोठा निर्णय! आता तृतीयपंथीयांना मिळणार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Transgender Education Scholarship: तृतीयपंथीयांना शिष्यवृत्ती तसेच स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचा आर्थिक, सामाजिक व सांस्कृ‍तिक ‍विकास घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार

Sep 10, 2026
चिखलीत महायुतीच्या भव्य दहीहंडीचा थरार; हजारो चिखलीकरांच्या उपस्थितीत उत्साहाला उधाण

चिखलीत महायुतीच्या भव्य दहीहंडीचा थरार; हजारो चिखलीकरांच्या उपस्थितीत उत्साहाला उधाण

Chikhli DahiHandi Festival: श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणाऱ्या दहीहंडी उत्सवाचा थरार, गोविंदांच्या मानवी मनोऱ्यांची चित्तथरारक उंची, ढोल-ताशांचा कडकडाट, डीजेच्या तालावर हजारो चिखलीकर..

Sep 06, 2026
गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्यास सोसायटी कारवाई करू शकते का? जाणून घ्या कायदा

गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्यास सोसायटी कारवाई करू शकते का? जाणून घ्या कायदा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते.

Aug 26, 2026