विरारमध्ये RTI कार्यकर्त्याची भरदिवसा हत्या; खदानीत दगडाने ठेचून खून, परिसरात खळबळ

जिल्ह्यातील विरार येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विरारमध्ये RTI कार्यकर्त्याची भरदिवसा हत्या; खदानीत दगडाने ठेचून खून, परिसरात खळबळ

RTI Activist

पालघर (RTI Activist) : जिल्ह्यातील विरार येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विरार पूर्वेतील शिरगाव भागातील खदानी परिसरात RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हा प्रकार मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या समोरच घडला. या घटनेत प्रभाकर पाटील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.

RTI कार्यकर्त्याचा खून

मृत व्यक्तीची ओळख आत्माराम पाटील अशी असून ते माहितीच्या अधिकाराचा वापर करून विविध प्रकरणांचा पाठपुरावा करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्यावर दगडाने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली.

शिरगाव खदानीत दुपारी घटना

मंगळवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास आत्माराम पाटील हे वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत शिरगाव येथील खदानी भागात गेले होते. ते व्हॅगनआर कारने घटनास्थळी पोहोचले असताना अचानक हल्ला झाला.

प्राथमिक तपासात खदान मालक महेश भोईर याचे नाव समोर आले आहे. त्याने आधी वाहनाची तोडफोड केली आणि त्यानंतर झालेल्या वादातून आत्माराम पाटील यांच्यावर दगडाने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात आत्माराम पाटील यांचा मृत्यू झाला.

अधिकारी जखमी, वाहनाचे नुकसान

या घटनेदरम्यान प्रभाकर पाटील यांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले असून आरोपीचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट नाही

ही हत्या खदानीशी संबंधित वादातून झाली की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. पोलिस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून RTI कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026