ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून अपुरी व चुकीची माहिती; माहिती अधिकार कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप!

गट ग्रामपंचायत एकलारा, गुंडी व वाटोद येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती अपुरी, चुकीची आणि विलंबाने पुरवल्याचा आरोप अर्जदार अर्जुन मारोती खिरोडे यांनी केला आहे

ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून अपुरी व चुकीची माहिती; माहिती अधिकार कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप!

RTI Act

५ दिवसांत कारवाई न झाल्यास द्वितीय अपिलाचा इशारा!

मानोरा (RTI Act) : तालुक्यातील गट ग्रामपंचायत एकलारा, गुंडी व वाटोद येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती अपुरी, चुकीची आणि विलंबाने पुरवल्याचा आरोप अर्जदार अर्जुन मारोती खिरोडे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला असून, ५ दिवसांत कारवाई न झाल्यास राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील करण्याचा इशारा दिला आहे.

अर्जदार खिरोडे यांनी दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. माहिती न मिळाल्याने त्यांनी दि. १० मार्च २०२६ रोजी प्रथम अपील दाखल केले. त्यानंतर ग्रामपंचायत सचिवांनी दि. २२ एप्रिल २०२६ रोजी माहिती दिली. मात्र, दिलेली माहिती अपुरी व चुकीची असून मुद्दाम विलंबाने देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, सचिवांनी कव्हरिंग लेटरमध्ये अर्जदार माहिती घेण्यास टाळाटाळ करत होता, असा उल्लेख केला आहे. मात्र अर्जदाराने ९ महिन्यांनंतर अपील केले असल्याने ते माहिती घेण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट होते. तसेच नमुना ८ अ आणि असेसमेंट रजिस्टर नमुना ८ अ यांच्या प्रती सविस्तर व क्रमाने न देता सचिवांनी जाणूनबुजून अपुरी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अर्जदाराने गटविकास अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, आपल्या स्तरावरून तातडीने कारवाई करण्यात यावी. जर ५ दिवसांच्या आत कारवाई करून पत्राचे उत्तर दिले नाही, तर राज्य जनमाहिती आयोगाकडे द्वितीय अपील करण्यास आपण कायदेशीर पात्र राहू, असेही अर्जात नमूद केले आहे.

या प्रकरणामुळे ग्रामपंचायत स्तरावरील माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026