रस्त्याच्या कामासाठी संतप्त ग्रामस्थांचा अनोखा निषेध

वारंवार निवेदने आणि आंदोलने करूनही रस्त्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी निषेध नोंदविला.

रस्त्याच्या कामासाठी संतप्त ग्रामस्थांचा अनोखा निषेध

Road Issue

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून निवेदन

परभणी (Road Issue) : गंगाखेड तालुक्यातील खळी, चिंचटाकळी, गौंडगाव, मैराळसांवगी मार्गे धारासूरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था आणि प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून अनोखे आंदोलन केले. वारंवार निवेदने आणि आंदोलने करूनही रस्त्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी हा निषेध नोंदविला.

गंगाखेड-परभणी मार्गावरील खळी पाटी येथून खळी, चिंचटाकळी, गौंडगाव, मैराळसांवगी मार्गे धारासूरकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. तसेच रूमणा पाटी ते धारासूर या मार्गावरील कामही अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या दोन्ही रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, यासाठी संबंधित विभागाकडे अनेकदा निवेदने देण्यात आली असून आंदोलनेही करण्यात आली. मात्र अद्याप कामास सुरुवात झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (१२ जून) दुपारी १ वाजता ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गंगाखेड येथील उपविभागीय कार्यालयात जाऊन उपविभागीय अभियंता अरविंद बामणीकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कार्यालयात उपस्थित नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

यामुळे संतप्त झालेल्या खळी, चिंचटाकळी, गौंडगाव, मैराळसांवगी आणि धारासूर परिसरातील ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंत्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध व्यक्त केला. तसेच रस्त्याचे डांबरीकरण आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीचे निवेदनही त्या खुर्चीसमोर सादर करण्यात आले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गंगाखेड येथील कार्यालयात शिपायाव्यतिरिक्त इतर कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता. तसेच उपविभागीय अभियंता अरविंद बामणीकर हे कार्यालयात सहसा उपलब्ध नसतात आणि दूरध्वनीलाही प्रतिसाद देत नाहीत, असा आरोप आंदोलकांनी केला.

यावेळी बोलताना कॉम्रेड ओंकार पवार यांनी रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

या आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून संबंधित रस्त्यांच्या कामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

संबंधित सामग्री

कोरचीतील रस्ते खड्डेमय; ३ कोटींच्या निधीच्या ‘तुकड्यां’वर सवाल!

कोरचीतील रस्ते खड्डेमय; ३ कोटींच्या निधीच्या ‘तुकड्यां’वर सवाल!

नगरपंचायतीचा दर्जा मिळून दशक पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाही कोरची शहरातील रस्त्यांची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होत आहे.

Aug 27, 2026
शासकीय बांधकामांवरील एकूण ३० टक्क्यांपर्यंतची अतिरिक्त तरतूद होणार टप्प्याटप्प्याने रद्द

शासकीय बांधकामांवरील एकूण ३० टक्क्यांपर्यंतची अतिरिक्त तरतूद होणार टप्प्याटप्प्याने रद्द

​​​​​​​नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल क्षेत्रातील शासकीय बांधकामांच्या अंदाजपत्रकातील अतिरिक्त दरांबाबत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Aug 14, 2026
गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरील मुख्य मार्गावर रहदारी धोकादायक

गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरील मुख्य मार्गावर रहदारी धोकादायक

कोरची तालुक्यापासून 9 कि.मी. अंतरावर असलेल्या कोटरा, माहाका, हितापाडी, मिसपिरी ते मकेंकसा या 3 कि.मी. रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

Aug 12, 2026
परभणीत व्यापार्‍याने तोडली शासकीय सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर...!

परभणीत व्यापार्‍याने तोडली शासकीय सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर...!

शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बसविण्यात आलेल्या शासकीय सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर विनापरवाना तोडण्यात आली.

Aug 09, 2026
कोंडोली येथील पांदण रस्त्याची दुरावस्था!

कोंडोली येथील पांदण रस्त्याची दुरावस्था!

तालुक्यातील कोंडोली शिवारातील श्री पितांबर महाराज मंदिरासमोरील एकलारा रस्तालगत असलेला गायरान पांदण रस्ता पावसाळ्यात अक्षरशः चिखलमय आणि दुष्कर बनला आहे.

Aug 08, 2026