अपघातातील मृतकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

स्कार्पिओमधील एकूण १५ प्रवाशांपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अकरा जण गंभीर जखमी झाले.

अपघातातील मृतकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Road Accident

भाडभिडी, कुनघाडा, गट्टेगुडा परिसरात शोककळा

चामोर्शी (Road Accident) : चामोर्शी तालुक्यातील तळोधी मोकासा मार्गावरील पोहार नदीजवळ रविवार दि. २९ मार्च  रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दगावलेल्या ४ जणावर आज सोमवारी सबंधितांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे भाडभिडी, कुनघाडा आणि गट्टेगुडा परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, स्कार्पिओ आणि ‘प्रविण टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ची प्रवासी गाडी यांच्यात पोहार नदीसमोरील पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये स्कार्पिओमधील एकूण १५ प्रवाशांपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अकरा जण गंभीर जखमी झाले.

या अपघातातील जखमींपैकी चालक गुरुदेव वासेकर आणि देवाजी गवारे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. इतर जखमींमध्ये प्रतिमा रतन मोगरकर, गुरुदेव चिरकुट कुनघाडकर, निखिल जराते, कुणाल श्रावण कन्नाके, सुधाकर नकटू कुनघाडकर, अमर सखाराम चलाख, रेखा अमर चलाख, वेदांत संजय वैरागडे आणि करण कुमरे यांचा समावेश असून त्यांच्यावर गडचिरोली येथील  जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चामोर्शी तालुक्यातील कुरुडजवळील रामपूर येथील अरुण कवळु किरमे यांची मुलगी ज्योती हिचा विवाह भाडभिडी मोकासा येथील चंद्रकांत धनराज कुनघाडकर यांच्याशी पार पडला होता. रामपूर येथे विवाह सोहळा आटोपून स्कार्पिओमधून वर्‍हाडी मंडळी परतत असताना हा भीषण अपघात घडला. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, अनेक प्रवाशांना छाती व डोक्याला गंभीर दुखापती झाल्या.अपघातानंतर सर्व जखमींना तात्काळ चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

चामोर्शी पोलिसांची तत्परता

या संपूर्ण घटनेत चामोर्शी पोलिसांनी तत्परता दाखवत महत्त्वाची भूमिका बजावली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बन्सोड, तसेच पोलीस कर्मचारी विनायक मस्कार आणि राम राऊत व होमगार्ड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्वरित अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करून जखमींना रुग्णालयात पोहोचविले.सध्या या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक डोंब करीत असून चामोर्शी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026