रिसोड नगर परिषद गणेशोत्सव

​लाडक्या बाप्पाला निरोप देताना जलस्रोतांचे रक्षण करण्याचे प्रशासनाचे आवाहन; निर्माल्य कलशांचीही स्वतंत्र व्यवस्था

Risod Municipal Council Ganeshotsav: श्री गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर नगर परिषद रिसोड प्रशासनाच्या वतीने शहरातील नागरिकांना घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करून पर्यावरण संवर्धन

​लाडक्या बाप्पाला निरोप देताना जलस्रोतांचे रक्षण करण्याचे प्रशासनाचे आवाहन; निर्माल्य कलशांचीही स्वतंत्र व्यवस्था

Risod Municipal Council Ganeshotsav

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी रिसोड नगर परिषदेचा पुढाकार; प्रांगणात कृत्रिम विसर्जन तलावाची सोय

रिसोड (Risod Municipal Council Ganeshotsav) : श्री गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर नगर परिषद रिसोड प्रशासनाच्या वतीने शहरातील नागरिकांना घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. 'माझी वसुंधरा अभियान' आणि 'स्वच्छ सर्वेक्षण २०२६' अंतर्गत जलप्रदूषण रोखण्यासाठी नगर परिषदेने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.

घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी (Risod Municipal Council) नगर परिषद प्रांगण, रिसोड येथे सुसज्ज कृत्रिम विसर्जन तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या वेळी मूर्तीसोबत येणारे हार, फुले, पत्री इत्यादी पूजा साहित्य थेट पाण्यात न टाकता त्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी विसर्जन ठिकाणी स्वतंत्र 'निर्माल्य कलश' ठेवण्यात आले आहेत. संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे. विसर्जनस्थळी भाविकांच्या सोयीसाठी प्रकाश व्यवस्था, स्वच्छता आणि आवश्यक कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत.

गणरायाला (Ganeshotsav) भावपूर्ण निरोप देताना निसर्गाचे रक्षण करणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) आणि रासायनिक रंगांमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन नगर परिषदेने तयार केलेल्या कृत्रिम तलावातच करावे, तसेच निर्माल्याचे पावित्र्य राखण्यासाठी ते निर्माल्य कलशातच टाकावे, असे आवाहन नगराध्यक्ष भगवानराव शिरसागर, उपाध्यक्ष विष्णू कदम, मुख्याधिकारी सतीश शेवदा,आरोग्य सभापती संतोष चराटे  आरोग्य विभाग प्रमुख रोहित बडेल यांच्या सह नगर परिषद रिसोड प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

अनंत चतुर्दशीला मुंबईसह राज्यभर गणरायाला भावपूर्ण निरोप; लालबागच्या राजाचे पहाटे विसर्जन

अनंत चतुर्दशीला मुंबईसह राज्यभर गणरायाला भावपूर्ण निरोप. ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका; पहाटे लालबागच्या राजाचे विसर्जन.

Sep 26, 2026

अनंत चतुर्दशीला मुंबईकरांना मोठा दिलासा; मेट्रो लाईन-3 रात्रभर धावणार, विसर्जनानंतर घरी परतणे होणार सोपे

अनंत चतुर्दशीला मुंबईकरांना मोठा दिलासा; मेट्रो लाईन-3 रात्रभर धावणार, विसर्जनानंतर घरी परतणे होणार सोपे

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीला मुंबई मेट्रो-3 रात्रभर धावणार. गर्दी आणि वाहतूक कोंडीच्या काळात भाविकांना परतीच्या प्रवासासाठी मोठा दिलासा.

Sep 24, 2026
ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाचा कडक बडगा; लाऊडस्पीकर लावण्याआधी ₹1 लाख भरा! नियमभंग झाल्यास डिपॉझिट जप्त

ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाचा कडक बडगा; लाऊडस्पीकर लावण्याआधी ₹1 लाख भरा! नियमभंग झाल्यास डिपॉझिट जप्त

लाऊडस्पीकर परवानगीसाठी मंडळांना ₹1 लाख, व्यक्तींना ₹50 हजार डिपॉझिट. नियमभंग झाल्यास रक्कम जप्त; फटाके आणि लेझर लाईटवरही हायकोर्टाचे निर्बंध.

Sep 24, 2026
चिखलीत 'अनेकांतून एकतेचा' संदेश; गावकऱ्यांची एकत्र महाप्रसाद पंगत आणि भव्य मिरवणूक

चिखलीत 'अनेकांतून एकतेचा' संदेश; गावकऱ्यांची एकत्र महाप्रसाद पंगत आणि भव्य मिरवणूक

Chikhali Ganeshotsav: चिखली येथील तरुणांनी यंदाच्या गणेशोत्सवात एक अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय पाऊल उचलले आहे. सुरुवातीला या छोट्याशा गावात चार वेगवेगळ्या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना

Sep 23, 2026