रिसोड जनगणना-२०२७

नगर परिषद रिसोड: 'जनगणना-२०२७' साठी यंत्रणा सज्ज; प्रगणक आणि पर्यवेक्षकांची 'फील्ड व्हिजिट' संपन्न

Risod Census 2027: रिसोड नगर परिषदाने जनगणना २०२७ साठी तयारी केली आहे. प्रगणक व पर्यवेक्षकांच्या तुकडीचे प्रशिक्षण व क्षेत्रीय भेटी संपन्न झाल्या आहेत.

नगर परिषद रिसोड: 'जनगणना-२०२७' साठी यंत्रणा सज्ज; प्रगणक आणि पर्यवेक्षकांची 'फील्ड व्हिजिट' संपन्न

Risod Census 2027

नगर परिषद रिसोड: 'जनगणना-२०२७' साठी यंत्रणा सज्ज; प्रगणक आणि पर्यवेक्षकांची 'फील्ड व्हिजिट' संपन्न

रिसोड ( Risod Census 2027) : देशाच्या आगामी 'जनगणना-२०२७' च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड नगर परिषद प्रशासन पूर्णपणे सक्रिय झाले असून, या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांच्या पहिल्या तुकडीचे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले. दिनांक २३ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत नगर परिषद सभागृहात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असून, नागरिकांच्या माहितीची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे.

​क्षेत्रीय भेट (Field Visit): प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी, २५ एप्रिल रोजी प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी शहरातील शिक्षक कॉलनी आणि व्यंकटेश नगर भागात प्रत्यक्ष क्षेत्रीय भेट दिली. यावेळी प्रत्यक्ष घर गणना कशी करावी, याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.  (Risod Census 2027) प्रात्यक्षिक कार्यादरम्यान स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रगणकांना आवश्यक माहिती पुरवून सहकार्य केले. ​क्षेत्रीय भेटीदरम्यान प्रत्यक्ष जमिनीवर काम करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत क्षेत्रीय प्रशिक्षकांनी सखोल मार्गदर्शन केले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा चार्ज जनगणना अधिकारी सतिश शेवदा यांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्याचे निरीक्षण केले.

​"जनगणना हे राष्ट्रहिताचे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. डिजिटल प्रणालीमुळे कामात अचूकता येईल. सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी या प्रशिक्षणाचा उपयोग करून हे कार्य गांभीर्याने पूर्ण करावे," अशा सूचना सतिश शेवदा यांनी यावेळी दिल्या. ​​या प्रशिक्षण व क्षेत्रीय भेटीप्रसंगी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी तथा अतिरिक्त चार्ज जनगणना अधिकारी . शिवनंदन बरडे, क्षेत्रीय प्रशिक्षक  दिपक बाजड व  आनंद भावसार, जनगणना लिपिक रितेश इरतकर, तांत्रिक सहायक  उमेश ढोमणे यांच्यासह नगर परिषदेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
वर्ध्यात एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राची मोठी भेट; जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी चालना

वर्ध्यात एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राची मोठी भेट; जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी चालना

Wardha SRPF Training Centre: राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) सर्व गटांसाठी वर्धा येथे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

Oct 01, 2026