जिल्हा बँक निवडणूक 

तब्बल 25 वर्षानंतर जिल्हा बँकेची निवडणूक 

District Bank Election: रिसोडमध्ये झनक आणि पाचरणे कुटुंबातील सदस्य निवडणुकीसाठी आमने-सामने आहेत. 25 वर्षांनंतर, या निवडणुकीने मतदारांना विशेष महत्त्व प्राप्त केले आहे.

तब्बल 25 वर्षानंतर जिल्हा बँकेची निवडणूक 

District Bank Election

निवडणूक होत असल्याने मतदारांना आले अन्यय साधारण महत्त्व 

रिसोड (District Bank Election) : गेल्या 25 वर्षांपासून बिनविरोध होणाऱ्या अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने यंदा खऱ्या अर्थाने राजकीय वळण घेतले आहे. रिसोड येथील ३०/१ अ, प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा /विकास सेवा सहकारी संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार अमित झनक यांच्या मातोश्री शोभाताई सुभाषराव झनक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पाचरणे यांचे सुपुत्र डॉ. विठ्ठल पाचरणे यांच्यात थेट लढत होत असल्याने जिल्ह्याचे राजकीय  सहकार क्षेत्रात वातावरण तापले आहे.

गेली अनेक दशके या बँकेवर झनक कुटुंबाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे, परंतु यंदा पहिल्यांदाच हे वर्चस्व निवडणुकीच्या मैदानात कसोटीला लागले आहे. विशेष म्हणजे, बाजार समितीचे माजी सभापती गजानन पाचरणे हे दरवेळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत, परंतु ऐनवेळी काही कारणास्तव ते अर्ज मागे घेत असत. मात्र, यंदाची निवडणूक परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. गजानन पाचरणे यांनी यावेळी माघार न घेता आपले सुपुत्र डॉ. विठ्ठल पाचरणे यांना रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे, झनक गटाने शोभाताई झनक यांच्या माध्यमातून आपली पकड कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. या एका जागेच्या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंकडून सर्वस्व पणाला लावले जात आहे.

या मतदारसंघावर आतापर्यंत झनक घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, 25 वर्षा नंतर यंदा प्रथमच त्यांना थेट निवडणुकीला सामोरे जावे लागत असल्याने राजकीय रंगत वाढली आहे. दुसरीकडे बाजार समितीचे माजी सभापती गजाननराव पाचरणे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत आपल्या पुत्राला रिंगणात उतरवले आहे. दरम्यान,  माजी मंत्री अनंतराव देशमुख, आमदार भावना गवळी,  तसेच जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष वामनराव देशमुख यांनी पाचरणे यांची बाजू लावून धरल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाल्याचे दिसून येते. जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी 25 वर्षा नंतर निवडणूक होत असल्याने मतदारांना  अन्यय साधारण महत्त्व प्राप्त झाले 
 आहे

संबंधित सामग्री

संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून संभाजीराव पाटील निलंगेकरांची आक्रमक भूमिका चर्चेत. बँकेच्या कारभारावरून अमित देशमुखांवर आरोप आणि भाजपसमोर सवाल.

Sep 23, 2026
देशमुख, निलंगेकर अन् जिल्हा बँक; आमदार बसवराज पाटलांच्या सत्कारामागचा हेतू उघड!

देशमुख, निलंगेकर अन् जिल्हा बँक; आमदार बसवराज पाटलांच्या सत्कारामागचा हेतू उघड!

MLA Basavaraj Patil: लातूरकरांनी आमदार बसवराज पाटील यांच्या मंगळवारी सत्कारासाठी खूनी लेटरपॅडचा संदर्भ उघडला. त्यांचे भाषण देशमुख, निलंगेकर आणि जिल्हा बँक परिस्थितीसंबंधीच्या विवादपूर्ण मतांना प्रबोधन

Jul 15, 2026
दानवे उमेदवारीवरून मविआत वाद; विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली नाराजी

दानवे उमेदवारीवरून मविआत वाद; विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली नाराजी

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

Apr 29, 2026
हिंगोली सोसायटीतून चंद्रकांत बांगर यांच्या नावाचा ठराव मंजूर; संचालकांचा सत्कार सोहळा उत्साहात

हिंगोली सोसायटीतून चंद्रकांत बांगर यांच्या नावाचा ठराव मंजूर; संचालकांचा सत्कार सोहळा उत्साहात

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून हिंगोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 23, 2026
इस्लामाबादमध्ये Lockdown: शाळा, कार्यालये आणि कारखाने बंद

इस्लामाबादमध्ये Lockdown: शाळा, कार्यालये आणि कारखाने बंद

Pakistan Lockdown: इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण शांतता चर्चांमुळे उच्च-सुरक्षा क्षेत्र निर्माण झाले आहे. शहरातील रस्ते, शाळा आणि कार्यालये बंद झाली आहेत, जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

Apr 23, 2026