रामनवमी यात्रा महोत्सवात मानवी मूल्यांचा संदेश - दर्शनाचार्य पंडित स्वामी श्री वृजेश्वरानंद सरस्वतीजी महाराज

तीर्थक्षेत्र (पोहरादेवी) परिसरातील हेलिपॅडला लागून असलेल्या भक्ती वेदांत मठात गुरुवार, दि. २६ मार्च रोजी रामनवमी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

रामनवमी यात्रा महोत्सवात मानवी मूल्यांचा संदेश - दर्शनाचार्य पंडित स्वामी श्री वृजेश्वरानंद सरस्वतीजी महाराज

Religious Event

मानोरा (Religious Event): तीर्थक्षेत्र (पोहरादेवी) परिसरातील हेलिपॅडला लागून असलेल्या भक्ती वेदांत मठात गुरुवार, दि. २६ मार्च रोजी रामनवमी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शेकडो भाविक, महिला व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता.

या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष जोगेश्वरानंद सरस्वतीजी महाराज, ह.भ.प. श्रीराम महाराज चिखलीकर, गिरीश चैतन्य महाराज (शिवशक्ती पीठ आश्रम), नंदगिरी महाराज (महादेव संस्थान, गिरणा-पुसद), हिम्मत महाराज, संत जयराम महाराज संस्थान (चेंबूर गड, मेहकर), मगन महाराज (पांगरी, ता. गेवराई, जि. बीड), तसेच माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड आणि तेलंगणा येथील आमदार बापूराव राठोड हे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी शास्त्री महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रामनवमी उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून मानवी मूल्ये आत्मसात करण्याची संधी आहे. “श्रीराम हे केवळ देवत्व नसून सत्य, प्रामाणिकपणा, संयम, कर्तव्यनिष्ठा आणि करुणा यांचे प्रतीक आहेत. प्रत्येकाने आपल्या जीवनात हे गुण अंगीकारणे आवश्यक आहे,” असे त्यांनी प्रतिपादन केले.

अनिल राठोड यांनी आपल्या भाषणात धर्म, अध्यात्म आणि समाजजागृतीचा संदेश देताना जाधव बंधूंनी मठासाठी दिलेल्या जमिनीचे कौतुक केले. “ही केवळ दानधर्माची कृती नसून खरी भक्ती आहे,” असे ते म्हणाले. तसेच अंधश्रद्धेपासून दूर राहून खऱ्या अध्यात्माचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. परिसरातील भागवताचार्य ह भ प श्रीराम महाराज चिखलीकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

तेलंगणा येथील आमदार बापूराव राठोड यांनी या स्थळाच्या पवित्रतेवर भर देत, “मानव जन्माचा योग्य उपयोग करून समाजसेवा व पुण्याचे कार्य करणे हेच खरे धर्म आहे,” असे सांगितले. तसेच मठाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
संत जयराम महाराज संस्थान टी बूरगड मेहकर चे हिंमत महाराज यांनी मठातून मिळणाऱ्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करत, पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. रामनवमी उत्सवातून समाजात सद्भावना, संस्कार आणि मानवी मूल्ये रुजवण्याचा संदेश देण्यात आला.अन्नदाते विनोद बल्लू जाधव (नेताजी नगर, लोणी) यांनी नाश्त्याची व्यवस्था केली, तर डॉ. सुभाष राठोड यांनीही सहकार्य केले.याप्रसंगी स्वामी शास्त्री महाराज यांचे वडील उपस्थित होते त्यांचे स्वागत श्रीराम महाराज व बापूराव राठोड यांनी केले. कार्यक्रम पार पडला यावेळी पंचक्रोशीतील शेकडो भाविक उपस्थित होते नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026