Ratnagiri Deputy Collector Action

रत्नागिरीत दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई; निशा कांबळे निलंबित, हर्षलता गेडाम यांची विभागीय चौकशी

शासकीय कामकाजातील अनियमितता आणि कर्तव्यातील निष्काळजीपणाच्या आरोपांवरून रत्नागिरीतील दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांविरोधात शासनाने प्रशासकीय कारवाई केली आहे.

रत्नागिरीत दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई; निशा कांबळे निलंबित, हर्षलता गेडाम यांची विभागीय चौकशी

शासकीय कामकाजातील अनियमितता आणि निष्काळजीपणाप्रकरणी महसूल व वन विभागाचे स्वतंत्र आदेश; कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ

रत्नागिरी : शासकीय कामकाजातील अनियमितता आणि कर्तव्यातील निष्काळजीपणाच्या आरोपांवरून रत्नागिरीतील दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांविरोधात शासनाने प्रशासकीय कारवाई केली आहे. महसूल व वन विभागाने एकाच दिवशी स्वतंत्र आदेश जारी करत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निशा कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, तर उपजिल्हाधिकारी (रोहयो) हर्षलता गेडाम यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे. यासंदर्भातील पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, एकाच वेळी दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांविरोधात झालेल्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

निशा कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निशा कांबळे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातच राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हर्षलता गेडाम यांच्याविरोधात विभागीय चौकशी

उपजिल्हाधिकारी (रोहयो) हर्षलता गेडाम यांच्याविरोधात गंभीर अनियमिततेच्या आरोपांवरून विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कार्यालयात वारंवार विनापरवानगी गैरहजर राहणे, पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे, रजेचे अर्ज विहित नमुन्यात आणि निर्धारित वेळेत सादर न करणे तसेच वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे, अशा स्वरूपाच्या तक्रारींचा उल्लेख शासनाच्या पत्रात करण्यात आला आहे.

महसूल व वन विभागाने एकाच दिवशी केलेल्या या दोन स्वतंत्र कारवायांमुळे रत्नागिरीच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026
 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद करण्याचा निर्णय घेतला.

Oct 02, 2026