Rajmata Jijau

राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीला त्यांचे नाव देऊन भूमीचा सन्मान व्हावा!

‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीला त्यांचे नाव देऊन भूमीचा सन्मान व्हावा!

बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची आ. श्वेता महाले पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चिखली : राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीचा ऐतिहासिक सन्मान वाढविण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत प्रशासनाला याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या नामकरणाचा हा विषय आता प्रशासकीय पातळीवर पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजमाता जिजाऊंची जन्मभूमी असलेल्या सिंदखेडराजा या ऐतिहासिक स्थळामुळे बुलढाणा जिल्ह्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करत स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. त्यांच्या या अतुलनीय योगदानाला कायमस्वरूपी अभिवादन म्हणून जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्यात यावे, अशी मागणी आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.

मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल

आमदार श्वेता महाले यांनी सादर केलेल्या निवेदनात बुलढाणा जिल्ह्याची ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनविषयक वैशिष्ट्येही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा, लोणार सरोवर, शेगावचे संत गजानन महाराज मंदिर, मेहकरचे श्री शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य तसेच विविध धार्मिक व पर्यटनस्थळांमुळे बुलढाणा जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे.

या मागणीचे महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ही बाब नामकरणाच्या मागणीसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

राजमाता जिजाऊंच्या नावाने जिल्ह्याची ओळख निर्माण करण्यासाठी आमदार श्वेता महाले यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ‘राजमाता जिजाऊनगर’ नामकरणाचा मार्ग प्रशासकीय प्रक्रियेतून पुढे जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

“जिजाऊंच्या महान कार्याला अभिवादन म्हणून नामकरण व्हावे”

“राजमाता जिजाऊसाहेबांच्या जन्मभूमीचा सन्मान आणि त्यांच्या महान कार्याला अभिवादन म्हणून बुलढाणा जिल्ह्याला ‘राजमाता जिजाऊनगर’ हे नाव मिळावे, ही माझी मनापासूनची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश दिल्याबद्दल त्यांचे आभार,” असे आमदार श्वेता महाले पाटील यांनी म्हटले आहे.

यामुळे राजमाता जिजाऊंच्या नावाने बुलढाणा जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026