Pune Traffic Update

पुणेकरांनो लक्ष द्या! २५ सप्टेंबरला 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद

२५ सप्टेंबरला पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे अनेक प्रमुख रस्ते बंद राहणार. पुणे पोलिसांनी वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि पार्किंगबाबत सूचना दिल्या.

पुणेकरांनो लक्ष द्या! २५ सप्टेंबरला 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद

सकाळी ९ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीत मोठे बदल; पुणे पोलिसांकडून पर्यायी मार्ग आणि अधिकृत पार्किंगचा वापर करण्याचे आवाहन

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक पूर्ण होईपर्यंत मध्यवर्ती पुण्यातील अनेक प्रमुख रस्ते वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी वाहतूक नियोजन केले आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीला २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सुरुवात होणार आहे. मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने वाहनचालकांनी मध्यवर्ती पुण्यातून प्रवास करताना वाहतूक बदलांची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

विसर्जनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रोड, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता आणि गुरुनानक रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. याशिवाय मिरवणुकीच्या मार्गावरील इतर रस्त्यांवरही परिस्थितीनुसार वाहतूक वळवण्यात येणार आहे.

विशेषतः लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, गणेश रोड आणि केळकर रोड परिसरात मिरवणुकीदरम्यान मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नागरिकांनी शक्यतो मध्यवर्ती पुण्यात खासगी वाहनाने जाणे टाळावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अत्यावश्यक कामासाठी प्रवास करावा लागल्यास पोलिसांनी निश्चित केलेले डायव्हर्शन पॉईंट, रिंगरोड आणि पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, विसर्जन मिरवणुकीच्या काळात नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करू नयेत, असेही पोलिसांनी सांगितले आहे. मिरवणुकीसाठी शहरात येणाऱ्या नागरिकांनी केवळ अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच वाहने पार्क करावीत. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीतील हे बदल लागू राहणार असल्याने नागरिकांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

२०२०च्या खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची मोक्का कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी आणि साक्षीदारांनी आरोप नाकारले.

Sep 29, 2026
नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हेंच्या पुण्यातील घरात पहाटे तरुणाची घुसखोरी. बॅगेत हातोडा, पकड, हातमोजे आणि 10 मीटर दोरी सापडल्याने तपासाला वेग.

Sep 28, 2026
पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीवर ३,५०० CCTV कॅमेऱ्यांची नजर; AI तंत्रज्ञानातून पोलिसांचे हायटेक सुरक्षा कवच

पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीवर ३,५०० CCTV कॅमेऱ्यांची नजर; AI तंत्रज्ञानातून पोलिसांचे हायटेक सुरक्षा कवच

पुणे गणेश विसर्जनासाठी ३,५०० CCTV आणि ४०० अतिरिक्त AI कॅमेरे तैनात. कमांड सेंटरमधून २४ तास गर्दी, संशयित आणि सुरक्षेवर नजर.

Sep 24, 2026
पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी 11 पोलिसांवर FIR. मानवाधिकार आयोगानंतर तपास CIDकडे.

Sep 24, 2026
अनंत चतुर्दशीला मुंबईकरांना मोठा दिलासा; मेट्रो लाईन-3 रात्रभर धावणार, विसर्जनानंतर घरी परतणे होणार सोपे

अनंत चतुर्दशीला मुंबईकरांना मोठा दिलासा; मेट्रो लाईन-3 रात्रभर धावणार, विसर्जनानंतर घरी परतणे होणार सोपे

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीला मुंबई मेट्रो-3 रात्रभर धावणार. गर्दी आणि वाहतूक कोंडीच्या काळात भाविकांना परतीच्या प्रवासासाठी मोठा दिलासा.

Sep 24, 2026