मृतकांच्या पत्नीस प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेतून २ लाखांचे लाभ 

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,शाखा घोट यांच्या वतीने प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत मृत व्यक्तींच्या वारसांना २ लाख रुपयांच्या विमा रक्कम वारसाच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले.

मृतकांच्या पत्नीस प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेतून २ लाखांचे लाभ 

Pradhan Mantri Suraksha Bima​​​​​​​

घोट परिसरातील ग्राहकांनी विमा योजनेचा लाभ घ्यावा – शाखा व्यवस्थापक चिंचोलकर यांचे आवाहन

घोट (Pradhan Mantri Suraksha Bima) : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,शाखा घोट यांच्या वतीने प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत मृत व्यक्तींच्या वारसांना २ लाख रुपयांच्या विमा रक्कम वारसाच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. सदर मृत व्यक्तीने या बँकेत प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना घेतलेली होती.मय्यत शिक्षक अरुण जोगेश्वर निमगडे  त्यांचे हृदयविकाराने  निधन झाले. त्या नंतर, बँकेने त्वरित कागदपत्रांची पूर्तता करून कमी कालावधीत मृतकांची पत्नी आम्रपाली अरुण निमगडे यांना विम्याच्या रक्कमेच्या लाभ देण्यात आला. या प्रसंगी शाखा व्यवस्थापक डी. जे. चिंचोलकर,पत्रकार हेमंत उपाध्ये,बँक निरीक्षक एन. सुंकरवार,उमेदच्या बँक सखी मालन अजमेरा तसेच सुधीर देवतळे,एन. टी. गेडाम, बी. एन. वानखेडे, एस. एच. रामटेके, किशोर पातेवार आदी उपस्थित होते.

यावेळी शाखा व्यवस्थापक चिंचोलकर यांनी आवाहन केले की,बँकेच्या सर्व खातेदारांनी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा घेऊन त्याचा लाभ घ्यावा.

सामान्य नागरिकांसाठी लाभदायक योजना

सर्वसामान्य व गरजू नागरिकांना मोठ्या रकमेचा विमा काढणे शक्य नसते. मात्र, केंद्र शासनाच्या या योजनेत केवळ ₹४३६ आणि ₹२० इतक्या कमी प्रीमियममध्ये २ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळत असल्याने या योजनेबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

फाळेगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

फाळेगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

Mahasul Samadhan Shibir: “शासन आपल्या दारी, सेवा आपल्या गावात”या संकल्पनेअंतर्गत महसूल विभागाच्या वतीने फाळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले

Jul 22, 2026